शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत कोरोनाकाळात लाखोंची उधळपट्टी; अधिकाऱ्यांमध्ये दालनांच्या सुशोभीकरणाची स्पर्धा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 17:14 IST

जुन्या इमारती जीर्ण झाल्याच्या नावाखाली दरवर्षी दोन चार दालनांची दुरुस्तीची कामे प्रस्तावित केली जात असून, त्यावर ४० ते ५० लाखांची दुरुस्ती केली जात आहे.

ठळक मुद्देदरवर्षी नूतनीकरणाच्या नावाखाली लाखोंची उधळपट्टी

- योगेश पायघन 

औरंगाबाद : एकीकडे विकासकामांच्या ६७ टक्के निधीला कोरोनामुळे कात्री लागली. तर आलिशान दालनांचा हेवा वाटावा अशा नूतनीकरणाची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. वर्षभरात उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तिसऱ्या दालनात स्थलांतरित व्हावे लागले. मात्र, कोरोना काळात दालनांवर लाखोंची उधळपट्टी गरजेची आहे का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या रस्ते, पुलांची दुरवस्था झाली. मात्र, त्यासाठी निधीची अडचण सांगून दुरुस्त्या रेंगाळल्या आहेत. त्यात जुन्या इमारती जीर्ण झाल्याच्या नावाखाली दरवर्षी दोन चार दालनांची दुरुस्तीची कामे प्रस्तावित केली जात असून, त्यावर ४० ते ५० लाखांची दुरुस्ती केली जात आहे.उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शिरीष बनसोडे पूर्वी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शेजारील सुस्थितीतील दालनातून कार्यभार हाकत होते. त्यानंतर त्यांनी महिला अधिकारी व पदाधिकारी विश्रांतीगृह म्हणून वापरत असलेल्या दालनाची दुरुस्ती करुन तिथे स्थलांतरित झाले. पूर्वीच्या दालनाचा वापर वाॅर रुम म्हणून आरोग्य विभाग करत आहे. सदस्यांच्या आक्षेपानंतर सोमवारपासून सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुख्य इमारतीतील सामान्य प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत बसायला सुरुवात केली आहे.

अधिकारी माघारी, पण मूळ प्रश्न अनुत्तरितचगेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या दालनाच्या सुशोभिकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या प्रकरणाच्या चाैकशीची मागणी सदस्य केशवराव तायडे यांनी केली. त्यानंतर महिला व बालकल्याण सभापतींनीही हे नूतनीकरण झालेले दालन महिला पदाधिकाऱ्यांना परत द्यावे अन्यथा कुलूप तोडून ताब्यात घेऊ असे स्पष्ट केले. मात्र, दुरुस्ती व सुशोभिकरणासाठी दालनांवर खर्च किती करावा हा मूळ प्रश्न पुन्हा अनुत्तरितच असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदAurangabadऔरंगाबादfundsनिधी