शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

‘बोलो प्यार से धन निरंकार’, संत समागमात लाखो भाविकांनी घडविले मानवतेचे विराट दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 13:31 IST

वार्षिक निरंकारी संत समागम : शोभायात्रेत विविध राज्यांतील लोकसंस्कृतीचा संगम

औरंगाबाद : कोणी वाहतूक व्यवस्थेच्या कामात होते... कोणी लंगरमध्ये सेवा देत होते... कोणी स्वच्छतागृहात स्वच्छतेचे काम करीत होते. काम दिले, तिथेच स्वयंसेवक थांबून सेवा देत होते. कोणी कोणाची जात-धर्म विचारत नव्हते. ‘मानवता हाच धर्म’ हाच संदेश सर्वांच्या हृदयात कोरला होता.

‘बोलो प्यार से धन निरंकार’ असा जयघोष करीत हजारो भाविक येत होते. कोणी वाट चुकले, तर त्यांना सेवेकरी ‘महात्मा’ म्हणून हात जोडून पुढील मार्ग दाखवत होते... तन मन धनाने सेवादलाचे १५ हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवक नि:स्वार्थपणे काम करीत होते. वार्षिक संत समागमच्या पहिल्या दिवशी लाखभर भाविकांनी हजेरी लावून श्रद्धा, सेवा, शिस्त, समर्पण, आणि मानवतेचे विराट दर्शन घडविले.

बिडकीन डीएमआयसीमध्ये ३०० एकरांवर ५६ व्या वार्षिक संत समागमाला शुक्रवारी लाखो भाविकांच्या साक्षीने सुरुवात झाली. ३ लाख चौरस फुटांच्या भव्य सभामंडपाच्या पूर्व बाजूने दुपारी १२ वाजता शोभायात्रेला सुरुवात झाली. सजविलेल्या पांढऱ्या शुभ्र वाहनाला रथाचे स्वरूप देण्यात आले होते. वाहनाला जरबेरा फुलांच्या गुच्छांनी सजविले होते. सद्गुरू माता सुदीक्षाजी आणि निरंकारी राजपिता रमित महाराज विराजमान झाले होते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी लाखो लोकांची झुंबड उडाली होती. एवढी गर्दी असतानाही कुठेही गोंधळ नव्हता. भाविकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन याद्वारे घडविले. शोभायात्रेत लेझीम पथकापासून, आदिवासी नृत्य, बंजारा नृत्य, कोळीनृत्य, ढोल नृत्य, विठ्ठल, विठ्ठल नामात पाऊली खेळण्यात रमलेले वारकरी, भांगडा ते गरबापर्यंत देशभरातील विविध राज्यांच्या लोकसंस्कृतीचा संगम शोभायात्रेत बघण्यास मिळाला. मुख्य प्रवेशद्वारावर सद्गुरूचे रथातून आगमन झाले, तेव्हा पृष्पवृष्टी करण्यात आली. मुख्य मंडपात जमलेल्या हजारो भाविकांनी ‘धन निरंकर’ असा जयघोष केला. त्यानंतर, भक्तिगीत, आध्यात्मिक प्रवचनात सर्वजण रमून गेले होते.

धरतीला स्वर्ग बनवासद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी सांगितले की, माणसाला माणसासारखी वागणूक द्या, कोणी उच्च नाही, कोणी निच्च नाही, सर्व समान आहेत. पहिले परमात्मा कोण आहे, हे जाणून घ्या, परमात्मा प्रत्येकात आहे. सर्व अहंकार सोडून मानव सेवेत स्वताला अर्पण करा. परमात्मा जाणल्यावर आत्मीयता निर्माण होते व नंतर माणुसकीचा भाव निर्माण होतो. एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होते. याच प्रेमातून आपण धरतीला स्वर्ग बनवू या.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद