शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

लड्डा दरोडा: सूत्रधारांच्या चौकशीचा पोलिसांचा अधिकार संपला, सोन्याचे गूढ गुलदस्त्यातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:43 IST

दरोड्यातील एकूण १७ आरोपी हर्सूल कारागृहात रवाना करण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या दरोड्याच्या सूत्रधारांच्या चौकशीचा पोलिसांचा अधिकार आता संपला आहे. दरोडा टाकणाऱ्या ५ जणांच्या पोलिस कोठडीची १४ दिवसांची मुदत संपल्याने मंगळवारी हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. भविष्यात दुसऱ्या गुन्ह्यात त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते. मात्र, ती शक्यता देखील धूसर आहे. दरोड्यातील एकूण १७ आरोपी हर्सूल कारागृहात रवाना करण्यात आले आहेत. अंबेजोगाईचा दरोडेखोर सुरेश गंगणेचा मित्र सूर्यकांत मुळे हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या आणखी एका मित्राला मंगळवारी उशिरा पुण्यातून ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

१५ मे रोजी लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याने संपूर्ण शहराला हादरवले. यात २६ मे रोजी दरोड्याचा मास्टरमाईंड अमोल खोतकर याच्या एन्काउंटरने दरोड्याला आश्चर्यकारक वळण मिळाले. एन्काउंटरचा सीआयडी तपास करत असून आतापर्यंत ७ पेक्षा अधिक अधिकाऱ्यांसह महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. दरोड्याचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेला आत्तापर्यंत ६० तोळे सोने व ३० किलो चांदीचा शोध लावण्यात यश मिळाले. यातील उर्वरित सोन्याचा सुगावा पोलिसांना लागला आहे. मात्र, त्याबाबत सबळ पुरावे नसल्याने वाच्यता केली जात नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

नियोजनापासून - विक्रीपर्यंतचा छडा लागलादरोड्यासाठी टीप देण्यापासून दरोड्यातील सोने खरेदी करण्यापर्यंत एकूण १८ जणांना आत्तापर्यंत यात अटक करण्यात आली. यातील मुळे वगळता मंगळवारपर्यंत १७ जणांची हर्सूल कारागृहात रवानगी झाली.

मुळेच्या नावावर कारची खरेदीगंगणेने १५ मे रोजी दरोडा टाकल्यानंतर १८ मे रोजी पुण्यातील अकिल नावाच्या डीलरकडून ६.५ लाखांत गाडी खरेदी केली होती. यासाठी त्याला सोहेलने पैसे देऊन सोने विकल्यानंतर ते परत करण्याचा करार ठरला होता. पोलिसांनी ही मारुती ब्रीझा कार मंगळवारी जप्त केली.

त्या मित्राची चौकशीगंगणे, मुळेच्या आणखी एका अवसेकर नावाच्या मित्राला पुण्यातून गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. दरोड्यानंतर तिरुपती दर्शनासाठी गेलेल्या गंगणे, अमोल व इतरांसोबत अवसेकरही होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत त्याची कसून चौकशी सुरू होती.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी