शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या वाट्याला प्रत्येकी २०० ग्रॅमच सोने, बाकी अमोलने स्वत:कडे ठेवले: दरोडेखोरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:22 IST

नांदेडला सोने विकणाऱ्या तिघांसह सराफ्याला अटक; ५.५ किलो पैकी ६० तोळे सोने हस्तगत

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरमधील उद्याेजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडाप्रकरणी २१ दिवसांनंतर पोलिसांना ६० तोळे सोने हस्तगत करण्यात यश आले. यात अंबेजोगाईचा सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे (वय ४५, रा. अंबेजोगाई) याने विकलेल्या १९४ ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत करत त्याचे तीन साथीदार व नांदेडच्या सराफा व्यावसायिकाला अटक करण्यात आली. त्यामुळे आता एकूण आरोपींची संख्या १६ वर पोहोचली आहे.

राज्यभर चर्चेत आलेल्या लड्डा यांच्या घरी पडलेल्या दरोड्यात २५ मे रोजी अमाेलच्या एन्काऊंटरनंतर ३१ मे रोजी गुन्हे शाखेने या संपूर्ण घटनेचा यशस्वीरीत्या उलगडा केला. लड्डा यांचा बालमित्र बालासाहेब चंद्रकांत इंगोले (४६) यानेच हा संपूर्ण दरोडा घडवून आणला. अमोल व याेगेश हाजबेने गंगणेला अंबेजोगाईवरून दरोड्यासाठी बोलावले होते. गंगणेच्या दाव्यानुसार दरोड्यानंतर त्याला व त्याचा मित्र सोहेल जलील शेख (२२, रा. अंबेजोगाई) यांच्या वाट्याला आलेले २०० ग्रॅम सोने मित्रांच्या माध्यमातून सराफा आशिष जयकुमार बाकलीवालला (४२, रा. वजीराबाद, नांदेड) विकल्याची कबुली दिली.

दोघांकडून पाच हजारांचे कमिशन-गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक विशाल बोडखे, संदीप साळुंके यांच्या पथकाने गंगणेच्या सोन्याचा तपास करत शेख अबुजर ऊर्फ शाहिद (२३), शेख सोहेल शेख मुस्तफा (२६, दोघे रा. अंबेजोगाई), शेख शाहरूख शेख रफिक (३२, नांदेड) सह बाकलीवालचा सहभाग निष्पन्न केला.-१५ मेच्या दरोड्यानंतर १८ मे रोजी गंगणेने सोहेलकडे सोने दिले. सोहेलने सोने वितळवून अबुजरला दिले. अबुजरने नांदेडचा चुलत भाऊ शाहरूखमार्फत बाकलीवालला १८ लाख ४० हजारात १९४ ग्रॅम सोने विकले.-या कामासाठी सोहेल, अबुजर, शाहरूखला गंगणेने ५ हजार रुपये दिले. तिघेही मातीतून सोने गाळून विकण्याचे काम करतात. उपनिरीक्षक बोडखे, साळुंकेच्या पथकाने सोहेलला पुण्यातून, तर इतरांना नांदेडमधून अटक केली.

प्रत्येकी २०० ग्रॅमचीच कबुलीअटकेतील दरोडेखोर, अमोलने त्यांना प्रत्येकी २०० ग्रॅमच सोने देऊन उर्वरित सोने व संपूर्ण चांदी स्वत:कडे ठेवल्याचा दावा चौकशीत करत आहेत. आता अमाेलने स्वत:कडे किती सोने ठेवले, कुठे ठेवले, याचा पोलिस शोध घेत आहेत. आतापर्यंत एकूण ६० तोळे सोने हस्तगत झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर