शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लड्डा दरोडा प्रकरण: लड्डांच्या घरातील संपत्तीची माहिती देणारा सातवा आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 11:43 IST

१५ मे रोजी लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याविषयी रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर, आर. एल. सेक्टरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातील संपत्तीविषयी वडगाव कोल्हाटीच्या शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या देवीदास नाना शिंदे (४५) याने माहिती देऊन दरोडा टाकण्यास सांगितल्याचे शुक्रवारी उघड झाले. हे पुराव्यानिशी निष्पन्न होताच गुन्हे शाखेने त्याला रात्री अटक केली.

१५ मे रोजी लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याविषयी रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. सोमवारी रात्री दरोड्यातील प्रमुख सूत्रधार अमोल बाबूराव खोतकर (३४, रा. पडेगाव) याचे गुन्हे शाखेने ‘एन्काउंटर’ केले, तर त्याचे साथीदार याेगेश सुभाष हाजबे (३१, रा. वडगाव कोल्हाटी), सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबिरोद्दीन (३७, रा. रांजणगाव शेणपुंजी), महेंद्र माधव बिडवे (३८, रा. साजापूर), सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे (४५, रा. अंबाजोगाई), सोहेल जलील शेख (२२, रा. अंबाजोगाई) यांची सध्या पोलिस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे.

शिंदे कोण, कसा अडकला ?देवीदास शिंदे वाळूजमधीलच एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बसवर चालक आहे. २०१६ मध्ये त्याच्यावर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवीदासला गुप्तधन, काळ्या जादूचा नाद आहे. तो हाजबेचा मित्र असून त्यांनी यापूर्वी अनेक वेळा काही ठिकाणी गुप्तधनाच्या लालसेने खोदकाम केल्याचे स्थानिकांनी सांगितले. देवीदासला देखील त्याच्या मित्राकडून लड्डा यांच्या घरात काेट्यवधींची रक्कम असल्याची माहिती मिळाली होती. त्या दोघांनी हाजबे व खोतकरला ती माहिती पुरवली. देवीदासला माहिती देणाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू होती.

रेकीत वापरलेली वाहने जप्तपोलिसांना शिंदेवर पहिल्यापासून संशय होता. हाजबेने दरोड्याच्या आधीच शिंदेला कॉल केला होता. हाजबेने दरोड्याच्या रेकीसाठी वापरलेली चारचाकी व माेपेड पोलिसांनी शुक्रवारी जप्त केली.

टॅग्स :Robberyचोरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी