शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लड्डा दरोडा प्रकरण: दरोडेखोरांनी लुटलेले सोने वितळवून विकले, नांदेडमध्ये छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 11:53 IST

गुन्हे शाखेच्या एका पथकाने बुधवारी नांदेडमध्ये छापा टाकत सराफा मार्केटमधून बाकलीवाल ट्रेडर्सच्या मालकाला ताब्यात घेतले.

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरमधील उद्याेजक लड्डा यांच्या घरातून लुटलेल्या सोन्याचे बहुतांश दागिने दरोडेखोरांनी वितळवून सराफांना विकले. गुन्हे शाखेच्या एका पथकाने बुधवारी नांदेडमध्ये छापा टाकत सराफा मार्केटमधून बाकलीवाल ट्रेडर्सच्या मालकाला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून आरोपी सुरेश गंगणे व त्याच्यात किती सोन्याचा व्यवहार झाला, हे स्पष्ट होईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जवळपास २० ते ३० लाखांमध्ये व्यवहार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

खरेच ५.५ किलो सोने चोरीला गेले का, हा पोलिसांचा संभ्रम कायम आहे. दरोड्यातील बहुतांश सोने अमोल खोतकर व सुरेश रामकिसन गंगणे (रा. अंबाजोगाई) यांच्याकडेच असल्याची माहिती अन्य दरोडेखोर देत आहेत. मात्र, तरीही पोलिसांनी प्रत्येक आरोपीची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. त्यांचे जबाब पडताळून पाहिले जात आहेत.

कोणाकडे किती ?अमोलच्या एन्काउंटरमुळे अद्यापही बाकीचे सोने कुठे आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. बहुतांश सोने गंगणेकडूनच हस्तगत होत आहे. अमोलच्या जवळील व्यक्तींची चौकशी अद्याप बाकी असल्याने त्याच्याकडील सोने मिळालेले नाही. मात्र, चांदीचे दागिने अमोलच घेऊन गेल्याचे त्याचे साथीदार सांगतात. मुख्य सूत्रधार याेगेश हाजबे (रा. वडगाव कोल्हाटी) याचेही सोने अमोलनेच घेतल्याची माहिती दिल्याने अधिक संभ्रम निर्माण झाला आहे. गंगणेचा साथीदार सोहेल जलील शेख अशा दोघांचे सोने गंगणेने बाकलीवालला विकल्याचा अंदाज आहे. बाकलीवालच्या चौकशीनंतर त्याबाबत नेमकी माहिती मिळेल, असे निरीक्षक संभाजी पवार यांनी स्पष्ट केले. कुख्यात, मुरलेले दरोडेखोर सबळ पुरावे लुटलेले सोने पुरावे वितळवून विकतात. गंगणेने देखील तीच पद्धत वापरल्याचे पोलिसांनी सांगितले.

अमोलकडे दोन पिस्तूलहजबेच्या घरझडतीत दरोड्यात लड्डा यांचा चालक संजय झळके यांच्या डोक्याला लावलेले पिस्तूल पोलिसांनी जप्त केले. अमोलकडे दोन पिस्तुले होती. त्यापैकी एक त्याने हाजबेकडे दिले, तर दुसरे त्याने एन्काउंटरदरम्यान पोलिसांवर हल्ल्यासाठी वापरलेले होते. ही दोन्ही पिस्तुले पोलिसांनी जप्त केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRobberyचोरी