शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीवर अत्याचाराचा जाब विचारणाऱ्या मित्राला संपविले; तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 12:23 IST

गंगापूर तालुक्यातील सिरजगाव येथील घटना; तीन आरोपींना अटक

गंगापूर : पत्नीवर डोळा ठेवून मित्राला दारूचे व्यसन लावले. त्यानंतर त्याच्या पत्नीवर अत्याचार केला. मित्राला हे कळल्यानंतर त्याने जाब विचारताच त्याला तिघांनी मारहाण करत विहिरीत ढकलून ठार केले. ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री १०:३० वाजता गंगापूर तालुक्यातील सिरजगाव येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी रायभान काशीनाथ थोरात (वय ४३), राहुल मच्छिंद्र आघाडे (वय ३१) व अनिल विठ्ठल सिरसाठ (वय २६) या आरोपींना अटक केली.

याविषयी अधिक माहिती अशी की, सिरजगाव येथील आरोपी रायभान थोरात याने गावातील एका ४५ वर्षीय व्यक्तीच्या पत्नीवर डोळा ठेवून दोन वर्षांपूर्वी त्याच्याशी मैत्री केली. यानंतर त्याला दारूचे व्यसन लावले. रायभान त्याला दारू पाजून त्याच्या घरी जायचा व त्याच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार करीत होता. पंधरा दिवसांपूर्वी सदरील बाब या व्यक्तीच्या लक्षात आली असता, त्याने पत्नीला याविषयी विचारले, तेव्हा तिने आपबीती सांगितली. याप्रकरणी रायभान यास जाब विचारला असता त्याने मित्राला मारहाण केली.

दरम्यान, शनिवारी (दि.१) रायभानसह राहुल आघाडे, अनिल शिरसाठ हे तिघे पुन्हा त्याच्या घरी आले. रात्री १०:३० वाजेच्या सुमारास या तिघांनी मिळून मित्राला पुन्हा लोखंडी पहार व काठ्यांनी मारहाण करत विहिरीत फेकून ठार केले. याबाबत कुणाला काही सांगितले, तर मारून टाकू, अशी धमकी त्याच्या पत्नी व मुलीला देत महिलेच्या कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. धमकीला घाबरून त्यांनी कोणालाही याबाबत सांगितले नाही. आरोपींनी या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगून रविवारी (दि. २) शेतात अंत्यविधी उरकून घेतला.

नातेवाइकांना सांगितली घटनामयताची पत्नी व मुलीने भीतीपोटी कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, नंतर हिमत करून मंगळवारी (दि.४) नातेवाइकांना घडलेली घटना सांगितली. इकडे गंगापूर पोलिसांना याबाबत कुणकुण लागताच उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहपोनि साईनाथ गिते, पोउपनि दीपक औटे,पोहेकॉ कैलास निंभोरकर, विजय नागरे,अमित पाटील,पोअ अभिजित डहाळे, पदमकुमार जाधव,विक्रम सुंदर्डे, बलबीर बहुरे यांनी गुन्हा उघडकीस आणला व तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या. मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद