शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पैठणच्या अपहृत तरुणाची २५ दिवसांनानंतर पोलिसांनी केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 13:21 IST

२५ दिवसांपूर्वी पैठण शहरातून अपहरण केलेल्या १९ वर्षीय तरुणाची पैठण पोलिसांनी भिवरी सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील एका बंद घराच्या लाकडी कपाटातून मोठ्या शिताफीने सुटका केली.

ठळक मुद्दे या तरुणाच्या वडिलाने आरोपीकडून वीटभट्टीच्या व्यवसायासाठी पाच लाख रुपये हात उसने घेतले होते. पैठण पोलिसांनी याप्रकरणी तीन महिलांसह चार आरोपींना अटक केली

पैठण ( औरंगाबाद ) : २५ दिवसांपूर्वी पैठण शहरातून अपहरण केलेल्या १९ वर्षीय तरुणाची पैठण पोलिसांनी भिवरी सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील एका बंद घराच्या लाकडी कपाटातून मोठ्या शिताफीने सुटका केली. या तरुणाच्या वडिलाने आरोपीकडून वीटभट्टीच्या व्यवसायासाठी पाच लाख रुपये हात उसने घेतले होते. दरम्यान, वीटभट्टी व्यवसायात सध्या मंदीचे वातावरण असल्याने घेतलेले उसने पैसे परत करणे शक्य न झाल्याने ४ एप्रिल रोजी या तरुणाचे पैठण येथून अपहरण करण्यात आले होते. गेले २५ दिवस या तरुणास लाकडी कपाटात बंद करून मोठा छळ करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. पैठण पोलिसांनी याप्रकरणी तीन महिलांसह चार आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात केली आहे.

पैठण येथील वीटभट्टी व्यावसायिक अशोक उमाजी पराड (रा. नवीन कावसान) यांनी विलास गायकवाड (रा. भिवरी सासवड, जि. पुणे) यांच्याकडून वीटभट्टीच्या व्यवसायासाठी पाच लाख रुपये उसनवारीवर घेतले होते. हे पैसे टप्प्याटप्प्याने परत देणार, असे पराड यांनी गायकवाड याला लिहून दिले होते. यापैकी ६० हजार रुपये परतफेड करण्यात आले होते. उसनवारी घेतलेल्या पाच लाखांपैकी चार लाख चाळीस हजार रुपये पराड यांना वेळेवर परत करणे शक्य न झाल्याने गायकवाड यांनी पैठण गाठून पराड यांच्याकडे पैशाची मागणी केली व रक्कम परत मिळत नाही हे लक्षात येताच गायकवाडने अशोक पराड यांचा मुलगा विश्वनाथ पराड (१९) याचे ४ एप्रिल रोजी जीपगाडीत बळजबरीने कोंबून अपहरण केले होते. 

याप्रकरणी अशोक उमाजी पराड यांनी ५ एप्रिल रोजी पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीवरून पैठण पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी संशयित आरोपींना पोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. के. वारे यांनी २५ एप्रिल रोजी अटक केली होती. यात आरोपी विलास गायकवाड, दिव्या विलास गायकवाड, प्रमिला विलास गायकवाड, संगीता राजेंद्र गायकवाड (सर्व रा. भिवरी, जि. पुणे) यांचा समावेश होता. मुख्य आरोपी प्रतीक विलास गायकवाड फरार झाला होता. या सर्व आरोपींची पोलीस कोठडी घेण्यात आली. पोनि. इमले यांनी हवालदार सिराज पठाण व पोलीस नाईक राजू बर्डे यांना २९ रोजी रात्री भिवरी येथे रवाना केले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींच्या घरावर छापा टाकून कपाटात दडवून ठेवलेल्या विश्वनाथची सुटका करून त्यास सोमवारी पैठण येथे आणले. त्याला बघून  आईने हंबरडा फोडला.

असा लावला पोलिसांनी तपासमुलाच्या वडिलाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक चंदन इमले यांनी आरोपीचे मोबाईल क्रमांक घेऊन त्यांचे लोकेशन तपासले तसेच कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) वरून संशयित आरोपी गुन्हा घडला त्यावेळेस त्याच ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सुदाम वारे, हवालदार सिराज पठाण, पोलीस नाईक राजू बर्डे यांनी आरोपीचे भिवरी सासवड येथील घर गाठून घरातील तीन महिलांसह एक जणास अटक केली. पोलीस कोठडीत इमले यांनी चारही आरोपींची वेगवेगळी चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीत मोठी तफावत आढळून आल्याने अपहरण केलेला मुलगा त्यांच्या घरातच असल्याची खात्री झाली. तातडीने हवालदार पठाण व बर्डे यांना मुलाच्या शोधासाठी रवाना केले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या घराची झडती घेत असताना एका कपाटात विश्वनाथ पोलिसांना आढळून आला व त्याची सुटका केली.

खूप छळ केला -विश्वनाथ पराडपैठण येथील गोलनाका परिसरातून सफारी गाडीतून आलेल्या तीन महिला व दोघांनी माझ्या गळ्याला चाकू लावून गाडीत बसविले. आवाज केला तर मारून टाकू, अशी धमकी दिली. भिवरी येथील एका बंद खोलीत डांबून मला खूप मारहाण करण्यात आली. मला गुडघ्यावर चालावे लागत होते. दोन शस्त्रधारी पहारेदार होते. चार वेळा पोलीस झडतीसाठी आले तेव्हा मला कपाटात डांबून ठेवायचे. मी प्रचंड दहशतीत असल्याने आवाज करण्याची हिंमत झाली नाही. परंतु काल जेव्हा पोलीस आले तेव्हा आरोपींनी मला कपाटात टाकले. पोलीस घराची झडती घेत असताना मी हळूच दरवाजा उघडून बाहेर पाहिले तेव्हा मी हे पैठणचे पोलीस असल्याचे ओळखले. तोपर्यंत राजू बर्डे यांनी कपाट उघडून मला बाहेर काढले. मी त्यांना घट्ट मिठी मारली. त्यांनी माझी सुटका केली, अशी आपबिती विश्वनाथ पराड याने सांगितली.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसhersulहर्सूलjailतुरुंग