शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

शेअर मार्केटमध्ये पैसे गमावले, ३० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून साडूलाच संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 19:37 IST

खंडणी मिळाली नसल्याने साडूचा मृतदेह शेतातील बांधावर पुरून टाकला

- श्यामकुमार पुरेसिल्लोड (छत्रपती संभाजीनगर):  सिल्लोड तालुक्यातील घाटनांन्द्रा येथील एका तरुणाने शेअर मार्केटमध्ये ३० ते ४० लाख रुपये गमावले. कर्जबाजारी झालेल्या या तरुणाने पैश्यांसाठी गावातीलच चुलत साडुचे अपहरण करून नातेवाईकांना ३० लाख रुपये खंडणी मागितली होती. मात्र, खंडणी मिळाली नसल्याने चुलत साडूचा खून करून मृतदेह शेतातील बांधावर पुरून टाकल्याची सुन्न करणारी घटना तालुक्यातील घाटनांद्रा येथे २५ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. मृताचे नाव कैलास नामदेव मोरे ( रा. घाटनांद्रा) असे असून संजय राजेंद्र मोरे ( रा.घाटनांद्रा) असे आरोपीचे नाव आहे. 

घाटनांद्रा येथील सेवानिवृत्त सैनिक नामदेव भुरकाजी मोरे यांचा मुलगा  कैलास नामदेव मोरे ( ३५) हा शनिवारी ( दि. २१) सकाळी दहा वाजेपासून अचानक बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी कैलासचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो सापडला नाही. कैलासचे वडील नामदेव मोरे यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात २२ सप्टेंबर रोजी तक्रार दिली. त्यावरून पोलीस अधीक्षक डॉ. विनय राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक संजय लाझेवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास दिला. गायब होण्यापूर्वी कैलास हा संजय सोबत शेतात गेला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी संजयला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच संजयने ३० लाखांच्या खंडणीसाठी कैलासचा खून केल्याची कबुली दिली.

ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, सिल्लोड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे, लहुजी घोडे, सचिन सोनार, राजेंद्र काकडे, अनंत जोशी, रंगराव बावस्कर, ज्ञानदेव ढाकणे,नामदेव शिरसाठ, राजेंद्र लोखंडे,विठलं डोके,वाल्मिक निकम,दीपक सुरोशे, योगेश तरमले, जीवन घोलप,संजय तांदळे यांनी केली. या प्रकारांचा तपास करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे हे स्वतः  गावात तळ ठोकून असल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.

कर्ज झाल्याने मागितली खंडणी, पण...माझ्यावर कर्ज झाले होते. पैसे कोठून आणायचे या विचारात असताना कैलासला शेतात नेऊन पैशांची मागणी केली. पण त्याने पैसे दिले नाही. यामुळे कैलासचा ताराने  गळा  आवळून खून केला. त्यानंतर ''३० लाख तैयार रखो, वरना कैलास की लाश भी नही मिलेगी'' असा मेसेज कैलासच्या भाच्याला करून मृतदेह शेतातील मका पिकात लपवून ठेवले. पैसे मिळाले नसल्याने दुसऱ्या दिवशी मृतदेह शेताच्या बांधावर खड्डा खोडून पुरल्याची कबुली संजयने दिली.

रात्रीच खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढलाबुधवारी रात्री आरोपी संजय राजेंद्र मोरे यास सोबत नेत पोलिसांनी शेतात पुरलेला संजयचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह कुजलेले असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यानी जागेवरच पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत कैलासच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद