शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसावरच खरिपाची पेरणी; कपाशीची सर्वाधिक लागवड

By साहेबराव हिवराळे | Updated: July 15, 2023 19:18 IST

एकही मोठा पाऊस झालेला नसल्याने जलसाठे कोरडेच आहेत.

- श्रीकांत पोफळेकरमाड :औरंगाबाद तालुक्यात खरीप लागवड ६३ टक्के पूर्ण झाली असून, अद्याप देखील मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जवळपास वीस दिवस पावसाचे आगमन उशिरा झाल्यानंतर पेरणीयोग्य व खरिपाची पिके जिवंत राहतील, इतकाच अधूनमधून रिमझिम पाऊस होत असल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे.

तालुक्यातील एकूण खरीप हंगामाचे पेरणीयोग्य क्षेत्र ८४७५९ हेक्टर आहे. त्यापैकी ५४११२.८ हेक्टर म्हणजे ६३ टक्के पेरणी पूर्ण झाली असून, कपाशीची सर्वाधिक ३७ हजार ३३२ हेक्टरवर लागवड करण्यात आलेली आहे. त्यापाठोपाठ ७५९४ हेक्टर मक्याची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात कडधान्याची एकूण पेरणी ५४४१.८ हेक्टर झाली असून, त्यातील ५२९७ क्षेत्रावर तुरीची पेरणी करण्यात आली आहे. तर मूग ७३, उडीद ४५.८ तर इतर कडधान्यांची २७ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. तेलबियांपैकी सोयाबीन १०३८ हेक्टर सूर्यफुलाची ४ व इतर १३ हेक्टरवर मिळून १०५५ हेक्टरवर तेल बियाणांची लागवड करण्यात आली आहे. पावसाळी बाजरीची देखील २६०१ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.

...तरीही पीकस्थिती बरीयावर्षी लागवडीला उशीर झाल्यानंतर पेरणी केलेल्या पिकांना आवश्यकतेनुसार अधूनमधून रिमझिम पाऊस होत असल्याने सध्या पिकांची परिस्थिती चांगली आहे. मात्र, एकही मोठा पाऊस झालेला नसल्याने जलसाठे कोरडेच आहेत. सतत काही दिवस पावसाने खंड दिल्यानंतर पिकांना देण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने कोरडवाहू क्षेत्र असलेले शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद