शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

वैजापूर तालुक्यातील खरीप पिके करपली; रबी हंगामही धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 3:57 PM

वैजापूर तालुक्यात आतापर्यंत केवळ ५१.७३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच खरिपाची पिके हातातून गेली आहेत.

- मोबीन खान  वैजापूर (औरंगाबाद ) : वैजापूर तालुक्यात आतापर्यंत केवळ ५१.७३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच खरिपाची पिके हातातून गेली आहेत. दुसरीकडे आॅक्टोबर महिना सुरू झाला तरी मोठा पाऊस न झाल्याने येथील नदी, नाले, तलाव, मोठमोठे प्रकल्प कोरडेठाक आहेत. यामुळे बळीराजाने आगामी रबी हंगामाचीही आशा सोडल्याचे चित्र आहे. या परिस्थितीमुळे यंदा तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे, हे निश्चित आहे.

आतापर्यंत तालुक्यात ५१.७३ टक्के २६९.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  ३० सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत हा पाऊस ५१.७३ टक्के आहे. शासन स्तरावर यंदाचा पावसाळा ३० सप्टेंबरला संपला आहे. त्यामुळे सोमवारपासून पावसाच्या रोजच्या नोंदी घेणे बंद झाले आहे. वैजापूर तालुक्यात पावसाच्या या १२० दिवसांत ४८.२७ टक्क्यांची तूट आहे, अशा परिस्थितीत यावर्षीच्या खरीप पिकांसोबतच आगामी रबीची पिके उगवून येणार किंवा नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. सप्टेंबरनंतर बरसणाऱ्या पावसाची अवकाळी नोंद होते. शासनाच्या योजना व सवलती व तसेच पाऊस कमी असल्यास उपाययोजना या चार महिन्यांच्या आकडेवारीवरच आधारित असतात. तसेच या चार महिन्यांत तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास सुरू असतो. या कालावधीत पावसाची मंडळनिहाय नोंद घेण्यात येते. मात्र, ३० सप्टेंबरनंतर फक्त अवकाळी पाऊस आल्यासच नोंद घेण्यात येते.  

वैजापूर तालुक्यात या कालावधीत ५२० मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २६९ मि.मी. पावसाची नोंद झाली. ही ५१.७३ टक्केवारी आहे. यामध्ये वैजापूर २८७, खंडाळा २४०, शिऊर २८०, लोणी खुर्द २२४, गारज १८९, नागमठाण २६७, बोरसर २७७, महालगाव ३२५, लाडगाव ३०३, लासूरगाव २९७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  पावसाची टक्केवारी पाहता जलसाठ्यांमध्ये समाधानकारक पाणी असेल असे दिसते. मात्र, प्रत्यक्षात पावसात सातत्य राहिले नसल्याने पाणी जमिनीमध्ये मुरले नाही़  त्यामुळे तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यासाठी प्रशासनाला आतापासूनच उपाययोजना कराव्या लागणार आहे.

 उत्पादनात मोठ्या प्रमाणात घटसप्टेंबर अखेरपर्यंत पावसाची नोंद घेतली जात असली तरी गणेशोत्सवानंतर पाऊस येण्याची शक्यता कमीच असते. गणेशोत्सवानंतर ऊन पडत असल्याने कपाशी, मका आदी पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. 

११ प्रकल्पांत थेंबही नाही तालुक्यात पावसाअभावी ११ प्रकल्प कोरडे आहे, तर शहरातील नारंगी मध्यम प्रकल्प, कोल्ही मध्यम प्रकल्प, सटाणा व गाढेपिंपळगाव लघुप्रकल्प जोत्याखाली आहे. सद्य:स्थितीत केवळ मन्याड साठवण तलावात १२ टक्के साठा शिल्लक आहे. कमी पावसामुळे जमिनीतही आर्द्रता कमी असल्याने यंदाच्या रबीवर थेट परिणाम होणार आहे. एकंदरीत यंदा वेळीच उपाययोजना न केल्यास पिण्याच्या पाण्याची बिकट समस्या निर्माण होणार  आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेती