शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात; सहा तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 12:22 IST

अडीच महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १५ प्रकारची पिके खरीप हंगामात घेण्यात आली आहेत यंदाच्या हंगामात ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.

औरंगाबाद : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. अडीच महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. १६ आॅगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात १५ प्रकारची पिके खरीप हंगामात घेण्यात आली असून, यंदाच्या हंगामात ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. ज्वारी, बाजरी, मका, तृणधान्ये, तूर, मूग, उडीद, कडधान्य, भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबीन, गळीत धान्य, कापूस, ऊस आदीची लागवड करण्यात आली आहे. साडेपाच लाख हेक्टरवर या पिकांची पेरणी झालेली आहे. फुलंब्री, पैठण, सिल्लोड, कन्नड, गंगापूर, खुलताबाद या तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, तर उर्वरित औरंगाबाद, सोयगाव आणि वैजापूर तालुक्यांत ५० टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच्या डीपीसीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील दुष्काळसदृश स्थितीकडे लक्ष वेधले होते. वैजापूर, गंगापूर, पैठण, खुलताबाद, कन्नड, सिल्लोड तालुक्यांतील खरीप हंगामाच्या परिस्थितीवर बैठकीत चर्चा झाली. दरमहा पिकांच्या आढाव्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत शासनाकडे दुष्काळासंदर्भात अहवाल पाठविण्यात येणार आहे. 

३० आॅक्टोबरपर्यंत शासन खरीप हंगामाबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. शासनाने याबाबत एक अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार तालुकानिहाय पिकपाण्याची माहिती शासनाकडे पाठवावी लागणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अहवाल ३० सप्टेंबरपूर्वी शासनाकडे पाठविण्यात येईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. 

३४० गावांत ३७८ टँकरजिल्ह्यातील ३४० गावांत ३७८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर जालना जिल्ह्यातील ३२ गावांत ४७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या दोन्ही जिल्ह्यांत ४४४ टँकर सुरू आहेत. यावरून पिण्याच्या पाण्याची अवस्था किती बिकट आहे, याचा अंदाज येतो. पावसाचा टक्का वाढला असला तरी भूजल पातळीत वाढ झाली नसल्यामुळे पाण्याचे संकट कायमच आहे. गतवर्षी औरंगाबाद जिल्ह्यातील चार तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला होता. यंदाही तीच परिस्थिती आहे. सध्या होत असलेल्या पावसाचा खरीप हंमागाला फारसा लाभ होणार नाही, असेच चित्र आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagricultureशेती