शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

३१ वर्षांत खैरेंना पहिल्यांदाच पराभवाचा धक्का;अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव ठरले गेमचेंजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:37 AM

अंतर्गत गटबाजी भोवली, शिवसेनेसह भाजपमधील काहींनी दिला दगा?

ठळक मुद्दे पूर्व, मध्य, पश्चिम मतदारसंघाने दिली आ. जलील यांना भरघोस मतांची साथग्रामीण भागातील मतदारांनी काँग्रेसऐवजी एमआयएमवर मारला शिक्काशिवसेना, काँग्रेसला बसला पराभवाचा मोठा दणका

औरंगाबाद : शिवसेनेचे औरंगाबाद लोकसभेतील उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांना ३१ वर्षांच्या राजकारणात पहिल्यांदाच पराभवाचा धक्का बसला असून, अंतर्गत गटबाजी आणि अ‍ॅन्टी इन्कमन्बन्सी फॅक्टरमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेने उमेदवारी बदलली असती, तर निश्चित निवडणूक निकालाचे चित्र वेगळे असते, असे बोलले जात आहे. शिवसेनेच्या पराभवाला अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी मोठा हातभार लावला. जाधव हे या निवडणुकीचे गेमचेंजर ठरले असून, आ. इम्तियाज जलील यांना दलित-मुस्लिमांसह सुशिक्षित मतदारांनी लोकसभेचे द्वार खुले करून दिले.

शिवसेनेची पहिली शाखा मराठवाड्यात स्थापन झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी ज्या निवडणुका लढविल्या त्या जिंकल्या. ही निवडणूक मात्र त्यांच्यासाठी घाम काढणारी ठरली. पक्षातील गटबाजी आणि अपक्ष उमेदवार जाधव यांनी ‘कास्टकार्ड’च्या आधारे खैरेंविरोधात आघाडी उघडली. भाजपनेदेखील हातचे राखून काम केले. खा. रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी पूर्ण भाजपने काम केल्याचा आरोप खैरे यांनी मतमोजणीपूर्वी केला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील जाधव यांना मदतीचा हात दिल्यामुळे खैरेंनी आखलेली रणनीती कोलमडली, याचाच फायदा आ. जलील यांना झाला, त्यांनी अतिशय भूमिगत पद्धतीने प्रचारतंत्र वापरून शिवसेनेच्या हिंदू-मुस्लिम या पारंपरिक राजकारणाला छेद देत विजयश्री खेचून आणली. या सगळ्या धामधुमीत काँग्रेसचे उमेदवार आ. सुभाष झांबड यांना १ लाख मतांचा पल्ला गाठता आला नाही. १६ तास चालेल्या मतमोजणी प्रक्रियेत क्षणाक्षणाला उत्कंठता शिगेला जात होती.

१९८० नंतर मुस्लिम समुदायाला संधीमुस्लिम समुदायाला १९८० नंतर खासदारपदी विराजमान होण्याची संधी आ. इम्तियाज जलील यांच्या रूपाने मिळाली आहे. ३९ वर्षांनंतर सोशल इंजिनिअरिंगच्या राजकारणाचा पॅटर्न राबवून भारिपचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खा. असदोद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने नवीन राजकीय समीकरणाची पायाभरणी औरंगाबादेत केली. त्याचे फळ म्हणून आ. जलील यांना ऐतिहासिक विजय मिळविता आला.२१ उमेदवारांचे डिपॉझिट जप्तनिवडणुकीत २४ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी २१ उमेदवारांना एकूण मतदानाच्या १६ टक्केमतदान घेता आले नाही. त्यामुळे त्यांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त झाले.

माझे बॅड लक असल्याचे म्हणाले खैरेपराभव होणार असल्याचे २३ व्या फेरीअंती खैरे यांच्या लक्षात आले होते; परंतु देवावर विश्वास आहे, निश्चित काहीतरी चांगला निकाल लागेल, असे खैरे म्हणाले; परंतु पुढील फेºयाअंती निकाल येताच माझे बॅड लक आहे, असे सांगून त्यांनी मतमोजणी केंद्र सोडले. 

जलील यांची विजयाची कारणे अशी-१) दलित-मुस्लिम मतांच्या जादूचा एमआयएमला लाभ.२) अपक्ष उमेदवार जाधव यांनी खैरेंचे मतदान फोडले.३) ग्रामीण भागातील मतदान काँग्रेसकडे गेले नाही.४) शहरातील नागरी समस्यांमुळे खैरेंना विरोध.५) शिवसेनेच्या मतविभाजनामुळे एमआयएम एकतर्फी जिंकले.चंदक्रांत खैरे यांच्या पराभवाची कारणे१) पारंपरिक प्रचार पद्धतीनेच मतदान मागितले.२) मनपातील राजकारणात ढवळाढवळीचा फटका.३) नवमतदारांच्या मनातील कल जाणून घेतला नाही.४) विकासाऐवजी सांप्रदायिक मुद्यांवर प्रचार.५) नाडी-पुडी, सबसे बड़ा बाबा या उपाधींमुळे अंधश्रद्धांध म्हणून टीका. 

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालChandrakant Khaireचंद्रकांत खैरे