शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खैरे साहेब, यंदा रात्री १ वाजेपर्यंत नाचा! गणेशोत्सव समन्वय बैठकीत खैरे-शिरसाटांत कोपरखळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 13:16 IST

विसर्जन मिरवणुकीत रात्री १२ काय १ वाजेपर्यंत नाचा. मी कमिशनर साहेबांना सांगतो कानाडोळा करायला. अरे सरकार कोणाचं आहे ! संजय शिरसाट यांची कोपरखळी गणेशोत्सव समन्वय बैठक : खैरे-शिरसाट यांच्यात राजकीय कोपरखळ्या; एकमेकांसाठी प्रार्थना आणि हास्यकल्लोळही

छत्रपती संभाजीनगर : खैरे साहेब, या टायमाला तुम्ही बिनधास्त राहा, रात्री १२ काय १ वाजेपर्यंत नाचा. मी कमिशनर साहेबांना सांगतो कानाडोळा करायला. अरे सरकार कोणाचं आहे, आणि हे संजय शिरसाट बोलतोय, काही दम आहे की नाही, असे म्हणत आमदार संजय शिरसाट यांनी गणेशोत्सवाची १२ वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्याची मागणी करणाऱ्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. भाषणाच्या शेवटी देखील, मी गणरायाकडे तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रार्थना करतो, असे म्हणत राजकीय शेरेबाजी करायलाही शिरसाट विसरले नाहीत.

गणेशोत्सवास शनिवारपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर पाेलिस विभागातर्फे बोलावलेल्या समन्वय बैठकीला आ. संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, माजी खासदार चंद्रकांत खैरे, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्या मांडल्या. त्याचवेळी शिरसाट व खैरे यांच्या भाषणातील राजकीय शेरेबाजी व कोपरखळ्यांनी मात्र बैठकीत एकच हास्यकल्लोळ उडाला.

'सीनिअर सिटिझन' कोण ? खैरेंकडे पाहत शिरसाट यांचा टोला९ मिनिटांच्या भाषणामध्ये शिरसाट यांनी तीन वेळा खैरेंना पाहत मिश्किल टिप्पणी केली. शिवाय, इतरांच्या भाषणादरम्यान दहा ते पंधरा मिनिटे गुफ्तगू देखील केले. खैरेंपासून काही अंतरावर बसलेल्या पृथ्वीराज पवार यांना उद्देशून बोलताना शिरसाट म्हणाले की, तुम्ही आता ‘ओल्ड’ झाला आहात. सीनिअर सिटिझनने आता नव्यांना संधी द्यायला हवी. खैरेंनी पूर्वी सतरंज्या उचलल्याचे सांगून हे मान्य केले. खैरे साहेबांचे भवितव्य उज्ज्वल राहो अशी विघ्नहर्त्याला मी प्रार्थना करतो, असे म्हणत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. हे ऐकून खैरेंनी त्यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि सभागृहात एकच हंशा पिकला.

सरकारचे सन्मानीय आमदार : खैरेगणेशोत्सवादरम्यान मागण्या ठेवताना खैरे यांनी ठिकठिकाणी खोदलेल्या रस्त्यांचा मुद्दा मांडला. यावेळी जैस्वाल व शिरसाट यांच्याकडे पाहत ‘या आमदारांनी पैसे आणले.’ तुम्ही ते ड्रेनेजसाठी फोडले. त्यांचं मोठं नुकसान होतं, मग लोकं त्यांना जाब विचारतात, त्यापेक्षा तुम्हीच त्यांना नकार देत जा, असे म्हणत खैरे यांनी जैस्वाल व शिरसाट यांचा दोन वेळेस 'सन्मानीय आमदार' असा खोचक उल्लेख केला आणि सभागृहात एकच हंशा पिकला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGanesh Mahotsavगणेशोत्सवSanjay Shirsatसंजय शिरसाटChandrakant Khaireचंद्रकांत खैरेPoliceपोलिस