शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात रॉकेलचा काळाबाजार ; शिधापत्रिकाधारकांनी दिले ‘हमीपत्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 19:09 IST

मराठवाड्यातील तब्बल १२ लाख ४१ हजार ५५४ शिधापत्रिकाधारकांनी रेशन दुकानांतून रॉकेल घेण्यासाठी गॅस जोडणी नसल्याचे हमीपत्र पुरवठा विभागाकडे भरून दिले आहे.

ठळक मुद्देरेशनवर रॉकेल पाहिजे १२ लाख नागरिकांकडून रॉकेलची मागणी 

औरंगाबाद : मराठवाड्यातील तब्बल १२ लाख ४१ हजार ५५४ शिधापत्रिकाधारकांनी रेशन दुकानांतून रॉकेल घेण्यासाठी गॅस जोडणी नसल्याचे हमीपत्र पुरवठा विभागाकडे भरून दिले आहे. त्यामुळे या शिधापत्रिकाधारकांना रॉकेलचा पुरवठा करावा लागणार आहे. काळ्याबाजारात रॉकेलची विक्री होत असल्यामुळे पुरवठा विभागाने हळूहळू कोटा कमी करण्याकडे भर दिला असून, हमीपत्रामुळे काळाबाजारातील रॉकेल विक्रीला आळा बसणार का? असा प्रश्न पुढे येत आहे. 

मराठवाड्यात १७ लाख ८९ हजार ९१० रॉकेल घेणारे कार्डधारक आहेत. प्रत्येक कार्डधारकाला चार लिटर रॉकेल मिळते. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात ७ हजार १७६ केएल (७१ लाख ७६ हजार लिटर) रॉकेलची आवश्यकता होती. शासनाने रॉकेल घेण्यासाठी हमीपत्राचा नियम लागू केल्यानंतर आॅक्टोबर महिन्यात ४ हजार ८२४ तर नोव्हेंबरमध्ये ४ हजार ४२८ केएल अशी नियतनात घसरण झाल्याचा दावा पुरवठा विभाग करीत आहे. 

दुसरीकडे हमीपत्रामुळे रॉकेलच्या कोट्यात वाढ होण्याची शक्यता आहे. हमीपत्राच्या नावाखाली रॉकेलचा काळाबाजार वाढण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे. शासनाच्या नवीन नियमानुसार रेशन दुकानांतून रॉकेल घेण्यासाठी  शिधापत्रिकाधारकांना गॅस जोडणी नसल्याचे हमीपत्र घेण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. रेशनिंग दुकानांतून धान्यासह रॉकेल वाटप करण्यात येते. मात्र शासनाने गॅस सिलिंडर वापरण्यावर अधिक भर दिल्याने रॉकेलचा कोटा कमी करण्याकडे भर दिला आहे. 

गॅस जोडणी नसलेले नागरिकजिल्हा         हमीपत्र देणारे कार्डधारक  औरंगाबाद        २,५८,४०९जालना        १,४८,८७२परभणी        १,०४,५३९हिंगोली        १,६२,६५४नांदेड        १,७५,७१६बीड        २,००,३९४लातूर        १,३५,५१०उस्मानाबाद        ५५,६४०एकूण        १२,४१,५५४ 

टॅग्स :Marathwadaमराठवाडाcollectorजिल्हाधिकारीTahasildarतहसीलदारgovernment schemeसरकारी योजना