शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

‘काश्मिरियत व भारतीयत वेगवेगळ्या नाहीत, त्या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 11:56 PM

काश्मिरियत व भारतीयत वेगवेगळ्या नाहीत. त्या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, काश्मिरियत ही एक जीवनशैली आहे. ती जोपासण्यातूनच काश्मीरचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास आज येथे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देलक्ष्मीकांत देशमुख : जीवन विकास ग्रंथालयाचा वर्धापन दिन

औरंगाबाद : काश्मिरियत व भारतीयत वेगवेगळ्या नाहीत. त्या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, काश्मिरियत ही एक जीवनशैली आहे. ती जोपासण्यातूनच काश्मीरचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास आज येथे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केला.जीवन विकास ग्रंथालयाच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘काश्मिरियत व भारतीयत : एकाच नाण्याच्या दोन बाजू’ या विषयावर ते सायंकाळी जीवन विकास ग्रंथालयाच्या सभागृहात व्याख्यान देत होते. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी होते.लक्ष्मीकांत देशमुख यांची नजीकच्या काळात काश्मीर प्रश्नावर कादंबरी येणार आहे. अलीकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काश्मीर प्रश्नाचा अभ्यास गांभीर्याने सुरू केला आहे. काश्मीरवर घरी एक कपाटभर पुस्तके असल्याची माहिती त्यांनी दिली.त्यांनी सांगितले की, भारत धर्मनिरपेक्ष राहिला, तरच काश्मीर धर्मनिरपेक्ष राहील. काश्मिरात काश्मिरियत जोपासली गेली पाहिजे. भारतमातेचा मुकुटमणी असलेल्या काश्मीरची प्रतीके पुढे आणली पाहिजेत. हरी पर्वत हे काश्मीरचे जिते जागते प्रतीक होय. हिंदू, बौद्ध, शीख आणि इस्लाम धर्माचा सुंदर मिलाफ काश्मिरात बघायला मिळतो. काश्मिरी भारतीयच आहेत, असे साऱ्या भारतीयांनी मानले पाहिजे. स्वतंत्र काश्मीरची कल्पना मुळीच शक्य नाही. भारताच्या संरक्षणासाठीही स्वतंत्र काश्मीर परवडणार नाही. धर्मनिरपेक्ष भारत... धर्मरिपेक्ष काश्मीर हेच खरे उत्तर होय.काश्मीर प्रश्न एका दिवसात सुटणारा नाही. त्यासाठी खूप मोठा त्याग करण्याचीही तयारी ठेवावी लागेल. काश्मिरी लोकांशी संवाद वाढवला गेला पाहिजे व काश्मिरी माणसाचा राग करणे सोडून दिले पाहिजे. काश्मिरी लोकांना भारतासोबत राहावे असेच वाटत असते. त्यामुळे तुम्ही आमचेच आहात, असा विश्वास त्यांना देत राहिले पाहिजे, असे आवाहन देशमुख यांनी केले.काश्मीरची स्थापना कशी झाली. तिथे १४ व्या शतकानंतर इस्लाग कसा वाढत गेला. तिथली संत परंपरा व साहित्य परंपरा कशी होती, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.प्रारंभी, देशमुख यांच्या हस्ते सरस्वतीपूजन करण्यात आले. त्यानंतर रा.श. वालेकर यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले, तर नितीन कंधारकर यांनी आभार मानले. माहिती आयुक्त दिलीप धारूरकर, जीवन विकास ग्रंथालयाचे कार्यवाह भा.बा. आर्वीकर, अनेक प्रकाशक व जाणकारांची यावेळी मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlibraryवाचनालय