शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कर दे धमाल! छत्रपती संभाजीनगरमध्ये रंगणार १७ डिसेंबरला महामॅरेथॉनचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 12:55 IST

मॅरेथॉनमध्ये २१ आणि १० कि.मी.मध्ये सहभागी झाल्यानंतर १२ लाखांपर्यंत असणार पारितोषिके.

छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुलावर दि. १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या या महामॅरेथॉनमध्ये अख्ख्या कुटुंबांसोबत धावण्याचा ‘गोल्डन चान्स’ मिळणार आहे. त्यामुळे कुटुंबासोबत धावण्याचा आपला आनंद द्विगुणीत करण्याची आणि एका महोत्सवाचे साक्षीदार ठरण्याची संधी यानिमित्ताने लोकमत समूहाने आपल्यासाठी निर्माण केली आहे. त्यामुळे सहभागी धावपटूंसाठी पुन्हा एकदा ‘कर दे धमाल’ करता येणार आहे.

समाजात एकोपा वाढविणारी निरोगी आरोग्याचा संदेश देणारी आणि आपसातील नाते आणखी वृद्धिंगत करणारी ही महामॅरेथॉन आता मराठवाड्याच्या नागरिकांसाठी जिव्हाळा निर्माण करणारी मॅरेथॉन झाली आहे.

असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन ॲण्ड डिस्टन्स रेसतर्फे (एम्स) पात्रता दर्जा प्राप्त असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही महत्त्व प्राप्त झालेल्या या महामॅरेथॉनची प्रत्येक जणच प्रतीक्षा करीत असतो. निरोगी आरोग्यासाठी व्यायामाचा श्रीगणेशा करण्यासाठीदेखील ही मॅरेथॉन मैलाचा दगड ठरणारी आहे. याचे कारण म्हणजे या महामॅरेथॉनमध्ये ज्यांना धावण्याची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी ३ व ५ कि. मी. हे अंतर असणार आहे. तसेच १२ पेक्षा जास्त व धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी ५ कि.मी. अंतराच्या फन रनचा यात समावेश आहे.

१६ वर्षांपेक्षा जास्त असणारे १० कि.मी. पॉवर रनमध्ये सहभागी होऊ शकतात, तर नियिमत सराव असणारे प्रोफेशनल धावपटूंसाठी २१ कि.मी. अंतर असणार आहे. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनचा लोकप्रियतेचा आलेख नेहमीच उंचावत राहिला आहे. धावू न शकणारेदेखील विविध पद्धतीने महामॅरेथॉनमध्ये आपले योगदान देऊ शकतात. विभागीय क्रीडा संकुलावर दि. १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

यंदा सातवे पर्वयंदा महामॅरेथॉनचे हे सातवे पर्व आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गत वर्षीप्रमाणे यंदाही सहा ठिकाणी लोकमत महामॅरेथॉनमध्ये धावण्याची संधी धावपटूंना मिळत आहे. यंदा लोकमत महामॅरेथॉनचा श्रीगणेशा ३ डिसेंबर रोजी महा मुंबई मॅरेथॉनने होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे दि. १७ डिसेंबर, नाशिक येथे दि. ७ जानेवारी, कोल्हापूरला दि. २८ जानेवारी, नागपूरला दि. ४ फेब्रुवारी आणि पुणे येथे दि. १८ फेब्रुवारी रोजी महामॅरेथॉन रंगणार आहे.

१२ लाखांपर्यंत पारितोषिकेमॅरेथॉनमध्ये २१ आणि १० कि.मी.मध्ये सहभागी झाल्यानंतर १२ लाखांपर्यंत असणार पारितोषिके. तसेच ३ आणि ५ कि.मी.मधील स्पर्धकांना मिळणार मेडल आणि प्रमाणपत्रे. यंदा होणारी महामॅरेथॉन ३ कि.मी., ५ कि.मी., १० कि.मी. आणि २१ कि.मी. अंतरात होणार आहे.

अत्युच्च दर्जाची महामॅरेथॉनदि. १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनसाठी धावपटू, नागरिक वर्षभरापासून शहरातील विविध मैदानांवर कसून सराव करीत आहेत. जगभरात प्रसिद्ध असणारे टोकियो, लंडन, न्यूयॉर्क मॅरेथॉनला साजेल अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग झालेेली ही अत्युच्च दर्जाची लोकमत समूहाची महामॅरेथॉन असल्याची प्रतिक्रिया सहभागी धावपटूंत नेहमीच असते.

ऑनलाइन नोंदणीसाठी :http://tiny.cc/LokmatAurangabad या लिंकवर सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना वैयक्तिक आणि ग्रुप रजिस्ट्रेशनही करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ९४२३९३१८७३, ८०५५५६२१२१, ७३८७३३३८७८, ८९९९६११९५४ या क्रमांकावर संपर्क साधा.

टॅग्स :LokmatलोकमतMarathonमॅरेथॉन