शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून शिक्षण व्यवस्थेवर हल्ले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:43 IST

सामान्यांनी शिकूच नये, अशी व्यवस्था केली जात आहे. या विरोधात देशाला लढावे लागेल असे प्रतिपादन विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला शिकण्याचा सल्ला दिला होता. कारण शिक्षण घेतले तर आम्ही प्रश्न विचारायला शिकू. आमचे शोषण होत आहे. हे आम्हाला कळेल; मात्र या सरकारला हेच नको आहे. शोषित वर्ग शिकला तर तो प्रश्न विचारेल. म्हणून शिक्षण व्यवस्थेवरच हल्ले केले जात आहेत. सामान्यांनी शिकूच नये, अशी व्यवस्था केली जात आहे. या विरोधात देशाला लढावे लागेल असे प्रतिपादन विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने केले.कन्हैया कुमारच्या बीड दौºयात ‘कॉफी विथ कन्हैया’ या कार्यक्रमात त्याने उपस्थितांशी मुक्त संवाद साधला. प्रा.डॉ. हेमराज वुईके यांनी प्रकट मुलाखत घेतली. यात कन्हैया कुमारने अनेक विषयांवरील आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.महाराष्ट्राला क्रांतीचा इतिहास आहे. आणि आझादीचा नारा हा काही आपण पहिल्यांदा दिला नाही. आज वर्णवाद, भांडवलशाही, सरंजामशाही यांच्या विरोधात आम्ही आझादी मागत आहोत. मोदी जसे या देशाचे नागरिक आहेत, तसाच मीही या देशाचा नागरिक आहे. प्रत्येक माणूस या देशावर प्रेम करतो, तितकेच प्रेम मी देखील करतो. एका गरीब कुटुंबातून आलेला मी विद्यार्थी आहे. मात्र या देशात गरीब असणे हाच गुन्हा आहे. तुम्ही गरीब असाल तर तुम्हाला चोर, बेईमान, दंगाई, देशद्रोही काहीही ठरवता येते. गरीब असून तुम्ही शिकता हा तर फार मोठा गुन्हा आहे. कारण तुम्ही शिकून प्रश्न विचारता आणि सत्तेला प्रश्न नको आहेत. जर नरेंद्र मोदी पस्तीसाव्या वर्षी एम.ए. करू शकतात. तर तिसाव्या वर्षी मी पीएचडी केली तर माझ्यावर प्रश्न का उपस्थित होतात? आम्ही शिकलो तर यांची गुलामी कोणी करणार नाही. त्यामुळे त्यांनी सामान्यांचे शिक्षण बंद केले आहे. मोदींच्या विदेश दौºयावर जेवढा पैसा खर्च होतो. त्याच्या निम्यामध्ये विद्यापीठातील फेलोशिप सुरू होऊ शकते. मात्र सरकारला हे करायचे नाही. विचार करणारे लोक सरकारला नको असून विद्यापीठामधून केवळ मशिन तयार व्हाव्यात, अशी या सरकारची धारणा आहे. आणि हेच बदलण्यासाठी विद्यार्थी चळवळी महत्त्वाच्या आहेत, असे कन्हैया कुमार म्हणाला.