शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कालिदासाच्या तोडीचा कवी पुन्हा जन्माला आला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:16 IST

‘मला कवी कालिदास पांडुरंगाच्या वारीच्या वाटेवर दिसतात. कालिदासाची सौंदर्यदृष्टी आजच्या कवींना लाजवणारी आहे. कालिदासाच्या तोडीचा कवी पुन्हा जन्माला आला नाही’ असे उद्गार आज येथे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे (पुणे) यांनी गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी, स. भु. परिसर येथे काढले.

ठळक मुद्देरामचंद्र देखणे : वेद प्रतिष्ठानला वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘मला कवी कालिदास पांडुरंगाच्या वारीच्या वाटेवर दिसतात. कालिदासाची सौंदर्यदृष्टी आजच्या कवींना लाजवणारी आहे. कालिदासाच्या तोडीचा कवी पुन्हा जन्माला आला नाही’ असे उद्गार आज येथे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे (पुणे) यांनी गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी, स. भु. परिसर येथे काढले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, औरंगाबादच्या वतीने देण्यात आलेल्या स्वा. सै. कै. वि. वा. देसाई ( देशपांडे) स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ‘कवी कालिदास आणि परंपरा’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. बी. वराडे हे अध्यक्षस्थानी होते. यंदाचा हा पुरस्कार वेद प्रतिष्ठान, औरंगाबादला देण्यात आला. तो डॉ. अशोक देव यांनी स्वीकारला. ११ हजार रु. रोख व स्मृतिचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. गतवर्षी प्रा. डॉ. सुहास पाठक व त्यांच्या सहकाºयांनी‘शिक्षण हक्क कायदा आणि मराठवाडा’ हा संशोधन प्रकल्प डॉ. अश्विनी वैष्णव व त्यांच्या सहकाºयांनी ‘औरंगाबाद जिल्ह्यातील शालेय ग्रंथालय’ हा संशोधन प्रकल्प स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेस सादर केला. यानिमित्त या सर्वांचा आजच्या या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. प्रारंभी, संस्थेचे सचिव डॉ. शरद अदवंत व वृंदा देशपांडे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. मोहन फुले यांनी सूत्रसंचालन केले तर जगदीश जोशी यांनी शेवटी आभार मानले.वेद घरोघरी जावा, अशी अपेक्षा पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. देव यांनी व्यक्त केली.आपल्या भाषणात डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, आपल्यासाठी ज्ञानेश्वरीच वेद होय. संतसाहित्य हाच महाराष्ट्राचा पाचवा वेद असून, वेदांवरच भारतीय संस्कृती अवलंबून आहे. अव्यक्त ज्ञानाचा व्यक्त आविष्कार म्हणजे वेद होय. वेद वाङ्मय पुरोगामी विचारांवर व विज्ञानावर आधारित आहे. त्यात अंधश्रद्धा नाही.भाषा टिकविण्यासाठी संस्कृती टिकविण्याची गरज आहे. ९० टक्के साहित्य हे काव्यांनी व्यापलेले असते. कविता हा संवेदनांचा उत्सव होय. कवी या शब्दाचा अर्थ द्रष्टा, सर्वज्ञ, ज्ञाता, प्रतिभासंपन्न असा होतो. संवेदनांशिवाय साहित्यनिर्मिती होतच नाही. कालिदास, भवभूती, माग, हर्ष, पाणिनी, अश्वघोष,भार्गवी, भास, दंडी, जयदेव ते पं. जगन्नाथांपर्यंतचा हा समृद्ध वारसा आहे. आजही कालिदास हवाय. त्याच्या प्रतिभेने पाश्चात्य कवीसुद्धा प्रभावित झाले, याकडे देखणे यांनी लक्षवेधले.