शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

कलाग्राममध्ये लोककला महोत्सव

By admin | Updated: February 10, 2015 00:32 IST

औरंगाबाद : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान, कलाग्राममध्ये पहिल्या कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान, कलाग्राममध्ये पहिल्या कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात विविध राज्यांमधील कलावंत सहभागी होणार आहेत. १२ फेब्रुवारी रोजी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक कें द्र, उदयपूर, जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दररोज सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० पर्यंत कला महोत्सव होणार आहे.सात राज्यांतील लोककलाप्रकार बघण्याची संधी शहरवासीयांना मिळणार आहे. गरवारे कम्युनिटी सेंटर महोत्सवाच्या आयोजनासाठी सहकार्य करीत आहे. महोत्सवात महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांतूनही २०० कलाकार विविध कलाकृती सादर करणार आहेत. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी जिल्हाधिकारी विक्रमकुमार, महापालिका आयुक्त प्रकाश महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.स्थानिक कलाकारांसाठी नूपुर महोत्सव ठेवण्यात आला आहे. पहिल्या दिवशी व्ही. सौम्यश्री व देवमुद्रा संस्थेचे विद्यार्थी नृत्याविष्कार सादर करतील. तसेच विक्रांत वायकोस यांचे शिष्य भरतनाट्यम सादर करतील. १५ रोजी पार्वती दत्ता यांचे शिष्य कथ्थक नृत्य सादर करतील.१२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता क्रांतीचौकातून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावर शाभायात्रेचे विसर्जन होईल. रसिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक अजय अंबेकर, द. म. क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूष कुमार आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक फुरकान खान यांनी केले आहे.