शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यास न्याय! कपाशी उगवली नाही; हायकोर्टाचा ४ कंपन्यांना प्रत्येकी ५० हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 12:23 IST

बोगस बियाणे प्रकरणात सात वर्षांनंतर निकाल

छत्रपती संभाजीनगर : सात वर्षांपूर्वी म्हणजे २०१८ साली कापूस पिकांच्या बियाण्यांची पेरणी केली. मात्र बियाणे बोगस असल्यामुळे पीक हातून गेले होते. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. जोशी यांनी चार कंपन्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड ठोठावला.

छत्रपती संभाजीननगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथील शेतकरी याकूब अय्यूब शेख यांनी ९ एकरांवर, २०१८ साली पेरलेले कपाशीचे बियाणे बोगस निघाल्याने पीक हातून गेले. त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. याकूब शेख यांनी ९ एकरांत राशी, आदित्य, तिअरा व नामधारी सीड्स कंपन्यांचे बियाणे पेरले होते. त्यांनी ७५० रुपयांची ४७५ ग्रॅमची बियाण्यांची नऊ पाकिटे खरेदी केली होती. त्या बियाण्यांच्या पाकिटांवर रोग पडणार नाही, रोगनाशक शक्ती अधिक असल्याचा तसेच लाल्या रोग पडत नसल्याचा कंपन्यांचा दावा होता. असे असताना रोग पडून पीक हातून गेल्याने शेख यांनी राज्याच्या आयुक्तांकडे अर्ज करून दाद मागितली; परंतु त्यांनी दुर्लक्ष केले.

अत्यल्प भरपाईमुळे कोर्टात धावऔरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिल्यानंतर खंडपीठाने राज्याच्या कृषी आयुक्तांना आदेशित करून शेतकऱ्याची सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. कृषी आयुक्तांनी सुनावणी घेतली. २० हजार रुपये भरपाईचे आदेश दिले. भरपाईची रक्कम अत्यल्प असल्याने त्यांनी खंडपीठात आव्हान दिले. खंडपीठाने चारही कंपन्यांना ५० हजार रुपये प्रत्येकी दंड लावत रक्कम याचिकाकर्ते शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. किशोर खाडे यांनी काम पाहिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer gets justice! High Court fines companies for failed cotton.

Web Summary : A farmer's cotton crop failed due to bogus seeds. The Aurangabad High Court fined four companies ₹50,000 each, ordering payment to the farmer after a long legal battle for adequate compensation.
टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ