शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वर्षानुवर्षे निव्वळ चर्चा, औरंगाबादेत १७ लाख नागरिकांसाठी फक्त २२ सार्वजनिक स्वच्छतागृह

By मुजीब देवणीकर | Updated: December 17, 2022 19:53 IST

महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे; पाच वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेविकांनी महिला शौचालयांचा अभाव असल्यामुळे सभागृहाचे कामकाज बंद पाडले होते.

औरंगाबाद : जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहरात दाखल होणाऱ्या विदेशी पाहुण्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. मात्र, शहरातील १७ लाख नागरिक सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने मागील अनेक वर्षांपासून प्रचंड त्रास सहन करीत आहेत. नागरिकांच्या या दु:खाशी मनपा प्रशासनाला काहीच देणेघेणे नसल्याचे दिसून येते. शहरात फक्त २२ सार्वजनिक शौचालये असल्याची धक्कादायक माहिती आहे.

पाच वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेविकांनी महिला शौचालयांचा अभाव असल्यामुळे सभागृहाचे कामकाज बंद पाडले होते. या रणरागिणींमुळे प्रशासनाने औरंगपुरा, मकबरा, राजनगर परिसरात युद्धपातळीवर महिला शौचालये उभारली, मोठा गाजावाजा करून याचे लोकार्पणही केले. दुर्दैवाची बाब म्हणजे शौचालय चालविण्यासाठी मनपाला आजपर्यंत कंत्राटदार न मिळाल्याने ती बंद आहेत. या शिवाय पुरुष शौचालयांचाही बराच अभाव दिसून येतो. गुलमंडीवरील किमान ५० वर्षे जुने शौचालय मनपाने कारण नसताना पाडले. आसपास नवीन शौचालय बांधण्याची घोषणा प्रशासनाने केली. पण नवीन तर सोडा; साधे मोबाइल टॉयलेटही मनपाने उभे केले नाही.

युरिनल प्रकल्पाचा फ्लॉप शोमागील वर्षी मनपा प्रशासनाने शहरात तब्बल १०० ठिकाणी प्लास्टिकचे युरिनल (लघवीसाठी) उभारण्याचा निर्णय घेतला. ३२ लाख रुपये खर्च करून युरिनल खरेदी केले. ५० पुरुषांसाठी, तर ५० महिलांसाठी हे युरिनल असतील, असे जाहीर झाले. वॉर्ड कार्यालयांनी मोजक्याच ठिकाणी हे युरिनल बसविले. त्यावर फक्त ५० लिटर पाण्याची टाकी बसविली. दिवसभरातून पन्नास वेळेस टाकीत पाणी कसे येईल, याचे नियोजन नाही. त्यामुळे हे युरिनलही बंद पडले.

नागरिक, व्यापाऱ्यांना प्रचंड त्रासघरातून बाहेर पडलेल्या एखाद्या नागरिकाला शौचालय गाठायचे असेल तर त्याने कुठे जावे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना तर सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय. अनेक मधुमेहींना तर वारंवार जावे लागते. बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिला, विविध दुकानांमध्ये काम करणाऱ्या महिलांची प्रचंड गैरसोय होते.

तीन स्वच्छतागृह तयार; पण...शहरात अलीकडेच मनपाकडून तीन स्वच्छतागृह उभारण्यात आली आहेत. मालमत्ता विभागाकडून कंत्राटदार नेमण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे.-अनिल तनपुरे, उपअभियंता, मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका