शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बस नाही धड, प्रवास जड

By admin | Updated: December 4, 2014 00:55 IST

सोमनाथ खताळ / राजेश खराडे, बीड ‘बसचा प्रवास, सुखाचा प्रवास’ असे अविर्भावात सांगणाऱ्या एसटीचा प्रवास सुखाचा नव्हे तर वेदना अन् दु:खाचा झाला आहे. फुटलेले आरसे, तुटलेल्या खिडक्या, नादुरुस्त वायपर,

सोमनाथ खताळ / राजेश खराडे, बीड‘बसचा प्रवास, सुखाचा प्रवास’ असे अविर्भावात सांगणाऱ्या एसटीचा प्रवास सुखाचा नव्हे तर वेदना अन् दु:खाचा झाला आहे. फुटलेले आरसे, तुटलेल्या खिडक्या, नादुरुस्त वायपर, निकामी हेडलाईट, फाटलेले सीटकव्हर अन् खिळखिळ्या बसगाड्या रस्त्यावरुन धावत आहेत. ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या स्टींगमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली. जिल्ह्यात एक हजाराहून अधिक बसगाड्या आहेत. त्यापैकी २५ बसगाड्यांची पाहणी केली तेंव्हा एसटीचा प्रवास किती खडतर आहे याची प्रचिती आली. ‘प्रवाशी हेच आमचे दैवत’ यासारखे अनेक ब्रीदवाक्य राज्य परिवहन महामंडळाने बनविलेले आहेत़ मात्र या ब्रीद वाक्यांची तेवढ्याच काटेकोरपणे अंमलबजावणी होते का? याची पाहणी करायला सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळ नाही़ अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षामुळेच बीड विभागात सध्या अनेक बस गाड्या भंगार अवस्थेत धावत आहेत़ यामुळे अपघातही होत असून बसचालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे़ बसगाड्यांना व्यवस्थित ‘ब्रेक’ नाहीत, ‘गिअर’ पडत नाहीत, ‘इंजिन’ खराब झालेले आहे, धक्का दिल्यावरच बस चालू होते, अशी स्थिती आहे. या बसगाड्यांच्या दुरूस्तीसाठी निधी आलेला असतो, साहित्यही आलेले असते तरीही बसगाड्या खिळखिळ्या कशा ? असा सवाल उपस्थित होत आहे.कधी होणार दुरूस्तीजिल्ह्यातील सर्वच आगारातील बसगाड्या खराब झालेल्या आहेत़ त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे़ एवढी गंभीर परिस्थिती असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे पाहण्यासाठी वेळही मिळत नाही़ आता या गाड्या कधी दुरूस्त होणार आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास कधी मिळणार असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे़ब्रेकविनाच बसगाड्या सुसाटअनेक बसगाड्यांना मागचे ब्रेकच नाहीत. समोरच्या ब्रेकवरच त्यांना स्थानकातून प्रवाशांना घेवून जावे लागते. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही बसचालकही याला गांभीर्याने घेत नाहीत. अहवाल देण्यापलीकडे काहीही होत नाही. मागचे ब्रेक नसल्यामुळेच बसगाड्यांचे अपघात होत आहेत.अनेक बसगाड्यांचे साईड इंडिकेटर गायब झालेले होते तर काहींचे फुटलेले होते. ४अनेकांचे आरसेच गायब झाल्याने बसचालकांना मागील वाहने पाहण्यासाठी चक्क बाहेर डोकावून पहावे लागत आहे.