शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मदतीची नुसती घोषणा; अधिवेशन संपले की सत्ताधाऱ्यांना शोधावे लागेल: चंद्रकांत खैरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:50 IST

चंद्रकांत खैरेंनी हिवाळी अधिवेशन आणि शेतकरी मदतीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले.

छत्रपती संभाजीनगर: ठाकरेसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी शिंदेसेना आणि भाजप नेत्यांवर अत्यंत स्फोटक टीकास्त्र सोडले. खैरेंनी हिवाळी अधिवेशन आणि शेतकरी मदतीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. "मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तुरळक पैसे मिळालेले आहेत, तोंड पुसण्यासारखे. तुम्ही घोषणा करता, मग द्या ना शेतकऱ्यांना ते पैसे. अधिवेशन संपले की या सत्ताधाऱ्यांना शोधावे लागणार आहे." मुख्यमंत्री सहायता निधी कोशाचा पैसा गेला कुठे? आम्ही अनेकवेळा चौकशीची मागणी केली आहे. तो पैसा जनतेच्या न्यायालयात आला पाहिजे, असे खैरे म्हणाले.

खैरे यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानावरून त्यांना थेट इशारा दिला. "संजय गायकवाड यांनी गद्दारी केली आहे आणि आता ते शिंदे यांच्याकडे जाऊन बोलतात. मी त्याला म्हणतो, तू जास्त बोलू नकोस, हे तुला घातक आहे. तुझी लेव्हल काय आहे? मी त्याला समज देतो आहे." तसेच जयंत पाटील आणि शंभूराजे देसाई या दोघांना अजूनही एक नंबरवर येण्याची आशा आहे, पण ते आता शक्य नाही, असेही खैरे म्हणाले.

अब्दुल सत्तार म्हणजे 'हिरवा साप'!खैरेंनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर अत्यंत कठोर टीका केली आणि गंभीर आरोप केले. "अब्दुल सत्तार हा हिरवा साप आहे. याने हिंदूंवरच नाही, तर मुस्लिमांच्या जमिनीही बळकावल्या आहेत." सत्तार आणि दानवे यांच्यातील जुन्या वादाचा उल्लेख करत, आता त्यांचे साटेलोटे आहे का? असा प्रश्नही खैरेंनी उपस्थित केला.

राणेंची लायकी आहे का?नारायण राणे यांनी केलेल्या 'जिहादी' वक्तव्यावरून खैरेंनी त्यांना थेट लक्ष्य केले. "मला राणेंचे वक्तव्य खटकले, हा काहीही बोलतो. तुमचे वडील सोनिया गांधीचे पाय दाबत होते. बाळासाहेबामुळे तुमचे कुटुंब मोठे झाले, तुमची लायकी तरी आहे का? उद्धव ठाकरे यांच्यावर बोलायला."

निवडणूक आयोग 'बटीक' झालेनिवडणूक आयोगावर टीका करताना खैरे म्हणाले, "राज्य निवडणूक आयोगाबाबत आम्ही का बोलतो, कारण १५-१५ हजार मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात टाकले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. राज ठाकरे एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. तरीदेखील त्यांचे ऐकले नाही. याचा अर्थ निवडणूक आयोग बटीक झाले आहे."

शिंदेसेनेत धुसफूस"चित्रलेखा यांनी व्हिडिओ काढला आहे. शिंदेंचे आमदार यांचे व्हिडिओ समोर येत आहेत. शिरसाट यांचा देखील व्हिडिओ समोर आला होता. हे काय चालले आहे?" असा सवाल खैरेंनी केला. तसेच 'लाडक्या बहिणींचा' निवडणुकीत गैरफायदा घेतल्याचा आरोप करत समाज कल्याण मंत्र्यांच्या खात्यात गोंधळ असल्याबद्दल संताप व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Khair blasts government: Empty promises to farmers, leaders will vanish.

Web Summary : Chandrakant Khaire criticizes the government's inadequate farmer aid and accuses leaders of disappearing after the session. He attacked Shinde's MLAs, Narayan Rane, and Agriculture Minister Abdul Sattar, alleging corruption and betrayal. Khaire also accused the Election Commission of bias.
टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेAbdul Sattarअब्दुल सत्तारNarayan Raneनारायण राणे chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर