शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
6
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
7
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
8
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
9
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
10
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
11
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
12
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
13
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
14
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
16
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
17
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
18
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
20
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार

उद्योग जगतात चैतन्य! बिडकीन डीएमआयसीमध्ये आणखी सहा कंपन्यांची १२६१ कोटींची गुंतवणूक

By बापू सोळुंके | Updated: June 25, 2025 19:57 IST

या कंपन्यांमुळे प्रत्यक्ष ३ हजार २८८ जणांना तर अप्रत्यक्ष तेवढ्याच लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

छत्रपती संभाजीनगर : येथील ऑरिक सिटींतर्गत असलेल्या डीएमआयसी शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात गुंतवणूक करण्याकडे जगभरातील उद्योजकांचा कल वाढत आहे. मागील आठ दिवसांत बिडकीन डीएमआयसीमध्ये नव्याने ६ कंपन्यांनी १२६१ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. या कंपन्यांमुळे प्रत्यक्ष ३ हजार २८८ जणांना तर अप्रत्यक्ष तेवढ्याच लोकांना रोजगार उपलब्ध होईल. या कंपन्यांना दोन दिवसांपूर्वी ऑरिक प्रशासनाने प्रस्तावपत्र दिले.

बिडकीन डीएमआयसीसाठी ८ हजार एकर जमीन संपादित करण्यात आली. या औद्योगिक वसाहतीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. प्लग ॲण्ड प्ले अशा या औद्योगिक वसाहतीत गतवर्षी टाेयटा-किर्लोस्कर, एथर एनर्जी, जेएसडब्ल्यू- ग्रीन मोबिलिटी आणि लुब्रिझोल या कंपन्यांनी गुंतवणुकीच्या घोषणा केल्या. या कंपन्यांसोबतच त्यांच्या व्हेंडर कंपन्यांनीही येथे उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गतवर्षीप्रमाणे चालू वर्षीही येथे नवीन, नवीन कंपन्यांकडून गुंतवणुकीची घोषणा होत आहे. मागील आठवड्यात एम्ब्रिको कंपनीने १ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. यानंतर लगेच उनो-मिंडा कंपनीने २१० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. या कंपन्यांसोबतच आता आणखी सहा कंपन्यांनी १२६१ कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. मेटलमन ग्रुप, राखाे इंडस्ट्रीज, टोयडा गोसाई, महिंद्रा असेलो, जुन्ना सोलार आणि एन. एक्स लॉजिस्टिक या कंपन्यांचा यात समावेश आहे.

या सर्व कंपन्यांनी बिडकीनमधील उद्योगसुलभ वातावरणाची पाहणी केल्यानंतर ऑरिककडे जमिनीची मागणी केली. उत्पादन प्रक्रिया, गुंतवणुकीचा तपशील आणि रोजगारनिर्मिती यासंबंधीचे सविस्तर प्रस्ताव त्यांनी सादर केले. त्याची सकारात्मक दखल घेत प्रशासनाने त्यांना जागा दिली. या पार्श्वभूमीवर ऑरिकने सोमवारी या कंपन्यांना ऑफर लेटर (देयकर पत्र) दिल्याची माहिती व्यवस्थापक महेश शिंदे पाटील यांनी दिली.

या आहेत नवीन कंपन्यामेटलमन ग्रुपकिती जमीन?- ७ एकरगुंतवणूक- १८७ कोटीथेट रोजगार- ५८८------------------------------------------------राखो इंडस्ट्रीज प्रा.लि.जमीन- ७ एकरगुंतवणूक- ९३ कोटीथेट रोजगार- ५५०--------------------------------टोयडा गोसाई प्रा.लि.जमीन--१० एकरगुंतवणूक- १४० कोटीथेट रोजगार- ५००---------------------------------महिंद्रा असेलो प्रा. लि.जमीन- १३ एकरगुंतवणूक- ३५५ कोटीथेट रोजगार- २००-----------------------------जुन्ना सोलार प्रा. लि.जमीन- १० एकरगुंतवणूक- ४०० कोटीथेट रोजगार- १०५०-----------------------एन. एक्स. लॉजिस्टिकजमीन- १३ एकरगुंतवणूक- ८६ कोटीथेट रोजगार- ४००

नवीन गुंतवणुकीने मराठवाड्याची भरभराटछत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी सहा प्रतिष्ठित कंपन्यांनी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. मराठवाड्याच्या क्षमतेवर आणि येथे विकसित होणाऱ्या मजबूत पायाभूत सुविधांवर आघाडीच्या औद्योगिक कंपन्यांचा विश्वास वाढल्याचे पुन्हा एकदा दिसून येतो. नव्या गुंतवणुकीमुळे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार नाही तर तरुणांना रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील.- उत्सव माछर, उपाध्यक्ष, सीएमआयए

नवीन व्यवसाय उपलब्धऑटो हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरची नवीन ओळख आता इव्ही हब अशी होत आहे. नव्याने येत असलेल्या सहा कंपन्यांमुळे रोजगार निर्मिती होणार आहे. लघू उद्योगांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नवीन व्यवसाय उपलब्ध होईल.-अर्जुन गायकवाड, अध्यक्ष, मसिआ

टॅग्स :DMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरAuric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर