शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

जोगेश्वरी : दुर्लक्षित लेणी वैभव

By सुमेध उघडे | Updated: July 29, 2021 19:56 IST

Unseen Aurangabad Jogeshwari caves : आपल्या पूर्वजांचा दुर्लक्षित राहिलेला अप्रतिम वारसा थोडा वेळ काढून वाकडीवाट करून एकदा तरी पहायलाच हवा.

ठळक मुद्दे वेरूळ लेण्यांच्या माथ्यावर असलेली ही लेणी अत्यंत लक्षवेधी आहे. लेणी पर्यटक आणि लेणी अभ्यासकांना पर्वणीच आहे. 

जिल्ह्यात अजिंठा-वेरूळ याशिवाय आणखीही प्राचीन लेण्या आहेत. केवळ योग्य माहिती नसल्याने पर्यटक या लेण्यांचा आस्वाद घेऊ शकत नाहीत. यातीलच एक लेणी आहे जोगेश्वरी. जंगल, नदी, धबधबा आणि लेणी असा एकत्रित नजराणाच येथे तुमची वाट पाहत आहे. वेरूळ लेण्यांच्या माथ्यावर असलेली ही लेणी अत्यंत लक्षवेधी आहे. येथे एकूण चार लेण्या आहेत. लेणीच्यावर उगमस्थान असलेली खाचखळग्यातून वाहणारी येळगंगा नदी येथील वातावरण अधिकच मनमोहक बनवते. असा हा आपल्या पूर्वजांचा दुर्लक्षित राहिलेला अप्रतिम वारसा थोडा वेळ काढून वाकडीवाट करून एकदा तरी पहायलाच हवा. 

कसे जाल - औरंगाबादपासून खुलताबाद २५ किमी आहे. खुलताबादपासून म्हैसमाळच्या रस्त्यावर गेल्यास काही अंतरावर डावीकडे जोगेश्वरी माता मंदिर अशी पाटी दिसेल. येथून एक ते दोन किमी आत गेल्यास एक वस्ती लागते. इथे रस्ता थांबतो आणि सुरु होते पाऊल वाट. गाड्या येथेच पार्क करून चालत पुढे गेल्यास काही अंतरावर दोन पाऊल वाट दिसतात. घनदाट झाडी आणि बारीक झुडपांच्या जंगलातून जाणाऱ्या दोन्ही वाटा लेण्याकडेच जातात. येथून दहा मिनिट चालत गेल्यास येळगंगा नदीचे मात्र नजरेस पडते. त्यापुढेच लेण्या आहेत. मुख्यतः पाऊल वाट आणि लेणी परिसरात खाचखळगे असल्याने जास्त पावसात येथे जाणे टाळा. 

काय पहाल - वेरूळ मधून वाहणाऱ्या येळगंगा नदीचा येथे उगम होतो. धबधब्याच्या रूपाने खाली येणारी ही नदी वाहत जोगेश्वरी लेण्याकडे येते. एका कोपऱ्यात दीप माळ दिसते, तर समोर विहिरीसारखी कुंड आहेत. एका लेणीत जोगेश्वरी देवीची मूर्ती आहे. दुसऱ्या लेणीत कोरलेले अस्पष्ट कैलास शिल्प आहे. तर आणखी दोन लेण्यात गर्भगृह आहेत. तिकडे जाण्याचा रस्ता खराब आहे. मात्र, दुरूनच लेणीवरील सुरेख कोरीव काम लक्षवेधून घेते.  ग्रामस्थांच्याशिवाय खूप कमी जणांना माहिती असलेली ही लेणी पर्यटक आणि लेणी अभ्यासकांना पर्वणीच आहे. 

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAjantha - Elloraअजंठा वेरूळ