शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

जोगेश्वरी ग्रामपंचायतीची करवसुली मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 10:40 PM

चालु अर्थिक वर्षात कर वसुलीसाठी जोगेश्वरी ग्रामपंचायतीने मोहीम हाती घेतली आहे.

वाळूज महानगर : चालु अर्थिक वर्षात कर वसुलीसाठी जोगेश्वरी ग्रामपंचायतीने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत कारखानदारांना नोटिसा बजावण्याचे काम ग्रामपंचायतीच्या वतीने सुरु करण्यात आले आहे.

जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत एकूण १५४ कारखाने असून, या कारखान्याकडे असलेल्या कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीतर्फे पावले उचलली जात आहेत. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत जोगेश्वरी, रामराई, रामराईवाडी, कमळापूर, नायगाव, बकवालनगर आदी गावांचा समावेश आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यामुळे या परिसराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावात पिण्याचे पाणी, ड्रेनेजलाईन, रस्ते, स्वच्छता आदी नागरी सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत कारखान्यांकडून कर वसुली करते. गावातील नागरिकांना विविध सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायतीने कारखान्याकडे असलेल्या कर वसुलीसाठी प्रयत्न सुरु केले आहे. या संदर्भात सरपंच सोनू लोहकरे, उपसरपंच मंगल निळ, ग्रामविकास अधिकारी बी.एल.भालेराव, सदस्य सूर्यभान काजळे, योगेश दळवी, नजीरखॉ पठाण, सुनील वाघमारे, कल्याण साबळे, कलीम शहा, पंडीत पनाड, छाया बोंबले, लक्ष्मीबाई कडर्लिे, सुमनबाई काजळे, वनिता नरवडे, करुणाबाई सोनकांबळे, अनिता सरोदे, लक्ष्मीबाई चव्हाण आदींनी कारखान्याकडील कर वसुलीचा निर्णय घेतला होता.

७ कोटी कर वसुलीचे उद्दिष्टग्रामपंचायत हद्दीत एकूण १५४ कारखाने असून, चालु अर्थिक वर्षात या कारखान्याकडून जवळपास ७ कोटी रुपयांचा कर वसुलीचे उद्दिष्ट ग्रामपंचायतीचे ठेवले आहे. या कारखान्यांकडील थकिम कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीकडून महिनाभरापासून नोटिसा बजावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. १५ मेपर्यंत जवळपास १०० कारखानदारांना ग्रामपंचायतीने नोटिसा बजावल्या आहेत.

...तर कारखान्यावर जप्तीची कारवाईगतवर्षीचा कर थकविणाºया कारखान्यांची मालमत्ता व यंत्र सामुग्री जप्त करण्याचा इशाराही ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आल्याची माहिती सरपंच सोनु लोहकरे, उपसरपंच मंगलबाई लोहकरे, ग्रामविकास अधिकारी बी.एल.भालेराव यांनी दिली. थकीत कारखानदारांनी ग्रामपंचायतीचा कर भरुन जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीTaxकर