शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगार तरुणाई शोधतेय यशरूपी ‘विठ्ठल’, चार पैशांसाठी कपाळी टिळा लावण्याचे काम

By संतोष हिरेमठ | Updated: July 18, 2024 19:18 IST

येवल्याहून छत्रपती संभाजीनगरात आले ४० तरुण : कोणी बारावी पास, कोणी पदवीधर, स्पर्धा परीक्षेची काहींकडून तयारी

छत्रपती संभाजीनगर : काही जण शेतमजुरी करतात. कोणी बारावी पास, तर कोणी पदवीधर. काहींनी तर पोलिस भरतीतही आपले नशीब अजमावले. मात्र, आयुष्यात यशरूपी विठ्ठलाचे दर्शन घडण्याची प्रतीक्षाच आहे. असे एक, दोघे नव्हे, तर तब्बल ४० तरुण. हे तरुण छोट्या पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या वारकरी, भाविकांच्या कपाळी अष्टगंध, बुक्का याचा टिळा लावत होते. घरी काही पैसे नेता येतील, या आशेने येवल्याहून हे सर्व तरुण शहरात दाखल झाले होते.

छोट्या पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या कपाळावर टिळा लावण्यासाठी नगर नाका ते वाळूजपर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी हे तरुण उभे होते. टिळा लावण्यासाठी ते हात पुढे करीत होते, तसे वारकरी थांबत होते. हे काम दिवसभर सुरू होते. टिळा लावल्यानंतर काही भाविक तरुणांच्या हातातील डब्यात काही पैसे टाकत होते, तर काही जण तसेच पुढे रवाना होत होते. डब्यात पडणाऱ्या पैशांकडे क्षणभर पाहून तरुण लगेच पुढच्या भाविकांकडे वळत होते.

पदवीधर अनिलने पोलिस भरतीत अजमावले नशीबयेवल्यातील खैरगव्हाण येथील अनिल वाघ या २१ वर्षीय तरुणाने नुकतेच नाशिक येथील पोलिस भरतीत स्वत:चे नशीब अजमावले. यश मिळण्याची प्रतीक्षा आहे. तो कधी शेतात मजुरी, तर कधी केटरिंगचे काम करतो. प्रत्येक भरती प्रक्रियेत तो प्रयत्न करीत आहे. छोट्या पंढरपूर येथे वारकऱ्यांना टिळा लावून चार पैसे मिळतील, यासाठी तो मित्रांसह मंगळवारी रात्रीच शहरात दाखल झाला होता. नगर रोडवर दिवसभर रस्त्यावर उभा राहून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तो टिळा लावत होता.

रमेश म्हणाला, ‘पाऊस नसल्याने काम मिळेना.’येवल्यातील रमेश म्हणाला, ‘शेतात काम करून चार पैसे मिळवितो; परंतु पाऊस नसल्याने कामच मिळत नाही. दिवसात हजार ते बाराशे रुपये मिळतील म्हणून भाविकांना टिळा लावण्यासाठी येथे आलो.’

बारावी पास, अर्धा एकर शेती, नाइलाजाने आलोबारावी पास असलेला रवींद्र ठाकरे म्हणाला, ‘अर्धा एकर शेती आहे. सध्या मूग लावला आहे. दिवसभरात काही पैसे मिळतील म्हणून येथे आलो. येण्या- जाण्यासाठी पाचशे रुपये जातील; परंतु किमान पाचशे रुपये उरतील.’

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAshadhi Ekadashiआषाढी एकादशी