शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

जेट एअरवेजच्या विमानाला पक्ष्याची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 22:31 IST

मुंबईहून औरंगाबादला येणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्याची घटना (बर्ड हिट) बुधवारी सकाळी घडली. विमानाच्या डाव्या पंख्याला पक्षी धडकल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून वैमानिकाने विमान सुखरूप धावपट्टीवर उतरविले. सुदैवाने कोणतीही विपरीत घटना घडली नसल्यामुळे विमानातील ९० प्रवासी बालंबाल बचावले. या घटनेनंतर औरंगाबाद-मुंबई विमान रद्द करण्यात आले.

ठळक मुद्देवैमानिकाचे प्रसंगावधान : ९० प्रवासी बालंबाल बचावले, औरंगाबाद-मुंबई विमान रद्द

औरंगाबाद : मुंबईहून औरंगाबादला येणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्याची घटना (बर्ड हिट) बुधवारी सकाळी घडली. विमानाच्या डाव्या पंख्याला पक्षी धडकल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून वैमानिकाने विमान सुखरूप धावपट्टीवर उतरविले. सुदैवाने कोणतीही विपरीत घटना घडली नसल्यामुळे विमानातील ९० प्रवासी बालंबाल बचावले. या घटनेनंतर औरंगाबाद-मुंबई विमान रद्द करण्यात आले.जेट एअरवेजचे विमान मुंबईहून बुधवारी पहाटे ५.१२ वाजता औरंगाबादकडे झेपावले. सकाळी ६.२० वाजेच्या सुमारास चिकलठाणा विमानतळावर उतरण्यासाठी विमान सज्ज झाले. विमानाला अचानक पक्ष्याची धडक बसल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. वैमानिकाने खबरदारी घेऊन विमान सुरक्षित धावपट्टीवर उतरविले. पुढील प्रवासाआधी विमानाची सुरक्षा तपासणी करण्यात आली. तेव्हा विमानाच्या डाव्या पंख्याला पक्ष्याची धडक बसल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षेच्या दृष्टीने हे विमान तात्काळ उड्डाण करण्यासाठी योग्य नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे औरंगाबाद-मुंबई विमानाचे उड्डाण थांबविण्यात आले.वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, ‘सीएमआयए’चे अध्यक्ष राम भोगले यांच्यासह राजकीय व्यक्ती, उद्योजक असे १३० प्रवासी मुंबईला जाण्यासाठी सकाळी ६ वाजता विमानतळावर आले होते. अपघातामुळे सर्वांनी सहकार्याची भूमिका दाखविली. प्रारंभी सुरक्षेच्या दृष्टीने पडताळणी आणि आवश्यक त्या दुरुस्तीनंतर हे विमान ८.३० आणि नंतर १२ वाजता उड्डाण करील, असे सांगण्यात आले. परंतु अखेरीस उड्डाण रद्द झाल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. त्यामुळे अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.किमान हजार फूट उंचपक्षी साधारपणे पाचशे ते एक हजार फुटांपर्यंत उडतात. त्यामुळे इतक्या उंचीवर विमानाला पक्ष्याची धडक बसण्याची शक्यता विमानतळावरील अधिकाºयांनी वर्तविली. पक्षी धडकण्याच्या घटनेनंतर विमानतळावर जेट एअरवेजच्या अधिकारी-कर्मचाºयांची एकच पळापळ सुरू होती. विमानाची दुरुस्ती करण्यासाठी तांत्रिक पथकाची मदत घेण्यात आली. ज्याठिकाणी पक्ष्याची धडक बसली, त्याची छायाचित्रे पाठवून तांत्रिक माहिती घेण्यात आली.सर्वसामान्य घटनाविमानाच्या पंख्याला पक्षी धडकल्याचे विमान उतरल्यानंतर लक्षात आले. पक्षी धडकणे ही सर्वसामान्य घटना आहे. त्यात कोणताही धोका नाही. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. खबरदारी म्हणून विमानाची दुरुस्ती करण्यात आली, अशी माहिती जेट एअरवेजच्या जनसंपर्क विभागातर्फे देण्यात आली.---------------

टॅग्स :airplaneविमानAccidentअपघात