शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

जेईई- मेन परीक्षेत शहरातील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

By admin | Updated: April 28, 2016 00:19 IST

औरंगाबाद : अभियांत्रिकीसाठी घेतल्या जाणाऱ्या देशपातळीवरील परीक्षा जेईई- मेनचा निकाल बुधवारी सायं. सीबीएसईद्वारे जाहीर करण्यात आला.

औरंगाबाद : अभियांत्रिकीसाठी घेतल्या जाणाऱ्या देशपातळीवरील परीक्षा जेईई- मेनचा निकाल बुधवारी सायं. सीबीएसईद्वारे जाहीर करण्यात आला. यात शहरातील गुणवंतांनी नेत्रदीपक कामगिरी के ली आहे. मागील काही वर्षांपूर्वी जेईईसारख्या परीक्षांमध्ये शहरातील विद्यार्थी पास होण्याचे प्रमाण अगदी नगण्य असायचे. बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी या परीक्षांमध्ये यश संपादित करायचे; परंतु आता जवळपास ५०० विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. ३ एप्रिल रोजी सदर परीक्षा घेण्यात आली होती. शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षेसाठी ठेवण्यात आलेले कट आॅफ गुण पुढीलप्रमाणे- खुला प्रवर्ग : १००, ओबीसी- ७०, एससी- ५२, एसटी- ४८. नारायणा ग्रुप आॅफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सनारायणा क्लासेसचा विद्यार्थी सुशांत राठी याने या परीक्षेत ३६० पैकी ३०१ गुण प्राप्त करीत उज्ज्वल कामगिरी के ली आहे. या परीक्षेत ३०० पेक्षा अधिक गुण मिळवणे ही मोठ्या कौतुकाची गोष्ट असल्याचे मत संस्थेचे संचालक डॉ. एम. एफ मल्लिक यांनी व्यक्त केले. संस्थेच्या जवळपास २२० पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात संस्थेचे डॉ. एम. एफ. मल्लिक, प्रा. विशाल लदनिया, दत्ता जाधव, प्रा. संतोष कालुंगे, प्रा. दुर्गेश सिंग, प्रा. गोधन सिंग, प्रा. अब्दुल हन्नान, प्रा. सुनील झा, प्रा. प्रदीप शुक्ला, प्रा. संजय सिंग, प्रा. प्रशांत शुक्ला, प्रा. देवदत्त झा, प्रा. अलोककुमार, जिशान अहेमद आदींची उपस्थिती होती. गायकवाड आयआयटी सेंटरअत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या आयआयटी प्रवेशासाठी जेईई- मेन ही परीक्षा अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजण्यात येते. या टप्प्यावर या सेंटरच्या ५० पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. या सर्व गुणवंतांचा सत्कार सेंटरचे संचालक प्रा. रामदास गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. गायकवाड यांनी या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांची जिद्द, कठोर मेहनत आणि प्राध्यापकांचे अचूक व सुनियोजित मार्गदर्शन याला दिले आहे. प्रा. प्रवीण महाजन, प्रा. राकेश दुबे, प्रा. दीप्ती दुबे, प्रा. गोपाल सिंग आदींची याप्रसंगी उपस्थिती होती. गुरुकुल क्लासेस आयआयटी डिव्हिजनगुरुकुल क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी जेईई- मेन परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. क्लासेसचे ८७ विद्यार्थी जेईई- अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले. ऋषिकेश बनकर या विद्यार्थ्याने ३०० गुण पटकावत क्लासमधून प्रथम येण्याचा मान पटकावला. संचालक प्रा. प्रदीप गिरी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आगामी जेईई- अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रा.अविनाश त्यागी, प्रा. संजय पोळे आदींची उपस्थिती होती.