शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
3
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
4
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
5
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
6
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
7
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
8
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
9
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
10
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
11
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
12
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
13
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
14
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
15
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
16
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
17
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
18
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
19
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
20
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO

चार दिवसात जायकवाडीच्या जलसाठ्यात ४ टक्क्यांनी वाढ; एकूण साठा ४३ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 19:50 IST

मागील आठ दिवसांपासून आवक होत असल्याने जलसाठ्यात वाढ

पैठण: स्थानिक पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस व नाशिक, नगर जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेल्या पाण्यामुळे गेल्या चार दिवसात धरणाच्या जलसाठ्यात ४.११ % वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी धरणात १६ हजार ३५० क्युसेक आवक सुरू होती. मात्र, सायंकाळी सहा वाजेपर्यंत आवक घटून ९ हजार ७९८ क्युसेक झाली होती. सध्या धरणाचा जलसाठा ४३.५७% झाला आहे.

आज दुपारी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणासाठी  होणारे विसर्ग  घटविण्यात आले होते. दि २२ सप्टेंबर पासून नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्ग सुरू असून अहमदनगर जिल्ह्यातून गेल्या पाच दिवसा पासून जायकवाडीसाठी विसर्ग सुरू आहे. परिस्थिती पाहूण हे विसर्ग कमी जास्त करण्यात येत आहे.

शुक्रवारी सायंकाळी दारणा धरणातून ११००, गंगापूर धरणातून ००, पालखेड धरणातून ८७४ क्युसेक्स व नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून ३६६२ क्युसेक्स विसर्ग सुरू होता. जायकवाडी धरणाच्या वर असलेल्या वैजापूर तालुक्यातील नागमठान येथील सरिता मापन केंद्रावर गोदावरी १०००० क्युसेक्स क्षमतेने वहात होती. यामुळे जायकवाडी धरणात पुढील दोन ते  चार दिवस  सातत्याने आवक सुरू राहील अशी अपेक्षा आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पाणी.... भंडारदरा धरणातून ००० क्युसेक्स, निळवंडे धरणातून ८२६ असा विसर्ग करण्यात येत होता. शुकी  ओझर वेअर मधून प्रवरेत १८९५ क्युसेक्स विसर्ग सुरू होता, हे पाणी गतीने जायकवाडी कडे झेपावले असून सायंकाळी नेवासा तालुक्यातील  मधमेश्वर बंधाऱ्यातून ३८०५ क्युसेक्स क्षमतेने जायकवाडीसाठी पाणी मिळत होते.  

जलसाठा ४३.५७ % दरम्यान गेल्या आठ दिवसांपासून आवक होत असल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी  जलसाठा ४३.५७ % झाला होता. गतवर्षी आजच्या तारखेला मात्र धरणात ९९.९५% जलसाठा होता. शुक्रवारी सायंकाळी धरणाची पाणीपातळी १५०९.८७ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा १६८३.८८५ दलघमी झाला असून या पैकी ९४५.७७९ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.

 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण