शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

जायकवाडी धरणात पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 18:09 IST

जायकवाडी धरणातून दररोज होत आहे ०.२९ दलघमी उपसा

- दादासाहेब गलांडे पैठण : मराठवाड्याला येणाऱ्या काळात दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी पाऊस कमी झाल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्नही निर्माण होणार असून, टँकर लॉबी पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

नाथसागरात वरच्या धरणातून हक्काचे पाणी आणताना न्यायालयीन लढा लढावा लागला आहे. आठ टीएमसी पाणी वरच्या धरणातून सोडण्यात आले; मात्र, जायकवाडी धरणात केवळ ५.६२ टीएमसी पाणी प्रत्यक्षात पोहोचले. मंगळवारी नाथसागर धरणाची पाणीपातळी ४३.७७ टक्के एवढी आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात ही पाणीपातळी ९३ टक्क्यांवर होती. यंदा मात्र पाणीसाठा अर्ध्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे पाण्याचे संकट येणाऱ्या काळात उभे राहणार आहे.

मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नाथसागर धरणाचे २७ दरवाजे अनेक वेळेस उघडून गोदापात्रात जवळजवळ २०९ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. मात्र, या वर्षी धरणाची परिस्थिती बिकट आहे. यंदा धरणाने पन्नाशीही गाठली नाही. नाथसागरातून अनेक एमआयडीसी, डीएमआयसीसह विविध शहरांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच छत्रपती संभाजीनगर शहरालाही याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. नाथसागर धरणातून दररोज ०.२९ दलघमी पाण्याचा उपसा होत असतो. तसेच सिंचनासाठी उजवा कालवा व डावा कालवा यामधून दोन पाणी पाळ्या आणखी शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत. डाव्या कालव्यातून २५ दिवस पाणी सोडले जाईल. तर उजव्या कालव्यातून पंधरा दिवस पाणी सोडले जाईल, असे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

धरणाची परिस्थिती बिकटआज रोजी पाणीपातळी ४३ टक्के आहे. वरच्या धरणातून केवळ ५.६२ टीएमसीच पाणी आले. ५० टक्क्यांच्या खाली पाणीसाठा होण्याची ही चौथी वेळ असून, यापूर्वी २०१२, २०१४, २०१८ ला अशी परिस्थिती निर्माण झाली होती. धरणातील पाणीसाठा हा वर्षभर पिण्यासाठी पुरेल एवढाच उपलब्ध आहे. दोन पाणी पाळीनंतर सिंचनासाठी पाणी धरणातून दिले जाणार नाही. भविष्यात उद्योगाचा पाणीपुरवठाही कपात केला जाऊ शकतो.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद