शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरण मृतसाठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:19 IST

चिंता : उन्हाळाभर पाणी पुरविण्याची प्रशासनासमोर कसरत

पैठण : एकीकडे जागतिक जल दिन साजरा करण्यात येत असताना अगदी याच दिवशी दुसरीकडे जायकवाडी धरणाची पाणीपातळी मृतसाठ्यात गेली. जागतिक जलदिनी जायकवाडी धरणाचा उपयुक्त जलसाठा संपल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करा, असाच हा जुळून आलेला योगायोग सांगत तर नसावा. जायकवाडीचा मृतसाठा लक्षात घेता उन्हाळाभर पाणी पुरविण्यासाठी जायकवाडी प्रशासनास कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.जायकवाडी धरणाचा उपयुक्त जलसाठा संपून धरणाची पाणीपातळी मृतसाठ्यात गेली आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पाणीपातळी मृतसाठ्यात पोहोचली असून, सकाळी ७ नंतर मृतसाठ्यातून उपसा करण्यात येत आहे. मृतसाठ्यात ३० टक्के गाळ असल्याने उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता पाण्याच्या नियोजनाची कसरत जायकवाडी प्रशासनास पेलावी लागणार आहे.जायकवाडी धरणात यंदा ४७.५० टक्के जलसाठा (उर्ध्व भागातील धरणातून सोडलेले पाणी मिळून) झाला होता. या वर्षात जायकवाडीच्या लाभक्षेत्रात दुष्काळी परिस्थितीमुळे जायकवाडीतून औरंगाबाद, जालना, परभणी आदी जिल्ह्यांतील बंधाऱ्यांसाठी पाणी सोडावे लागले. परळी थर्मलसाठी अतिरिक्त पाणी सोडावे लागले, सिंचनासाठी नियमित रोटेशन देण्यात आले. त्यातच गेल्या ८ दिवसांपासून बाष्पीभवन प्रक्रियेत वाढ झाल्याने अपेक्षेपेक्षा लवकर यंदा जायकवाडीचा उपयुक्त जलसाठा संपुष्टात आला. डाव्या व उजव्या कालव्यातून सुरू असलेला विसर्ग २० मार्च रोजी बंद करण्यात आला, असे दगडी धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले.मृतसाठा कसा पुरणार?जायकवाडीच्या मृतसाठ्यात ७३८ दलघमी एवढा जलसाठा असून, यात आज रोजी ३० टक्के गाळ आहे. यानुसार २२१ दलघमी पाणी गाळाने कमी झाले आहे. म्हणजे फक्त ५१६ दलघमी पाणी मृतसाठ्यात असून, यापैकी फक्त ३५० दलघमी पाण्याचा उपसा करता येतो. सिंचन, औद्योगिक वसाहत, पाणीपुरवठा, आपत्कालीन पुरवठा व तापमानात वाढ झाल्याने प्रतिदिन १ दलघमी होणारे बाष्पीभवन यामुळे जूनअखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी प्रशासनास कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपात