शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या पाण्यावर जगविलेला हुरडा बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 19:03 IST

दुष्काळ असतानाही हुरडा हिरवागार दिसत आहे, कारण शेतात टँकरने पाणी देऊन तो जगविला जात आहे.

ठळक मुद्देउत्पादन कमी झाल्याने २५० रुपये प्रतिकिलो भाव दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ६० ते ७० टक्के उत्पादन घटले 

औरंगाबाद : हिरवागार सुरती गुळभेंडी हुरडा गुलमंडीवर विक्रीसाठी आला आहे. हा हुरडा २५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. दुष्काळ असतानाही हुरडा हिरवागार दिसत आहे, कारण शेतात टँकरने पाणी देऊन तो जगविला जात आहे. असे असतानाही यंदा ६० ते ७० टक्क्यांपर्यंत हुरड्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

हिवाळ्याला सुरुवात होताच हुरडा बाजारात विक्रीला येत असतो. गुलाबी थंडीमध्ये तर हुरडा खाण्याची मज्जाच काही औरच असते. गंगापूर तालुक्यातील नरसापूर व सारंगपूर या छोट्याशा गावांचे अर्थकारण याच हुरड्यावर चालते. येथील हुरड्याची चव खवय्यांच्या जिभेवर दीर्घकाळ रेंगाळते. मागील वर्षी पावसामुळे हुरडा खराब झाला होता. यामुळे डिसेंबरच्या अखेरीस ६०० रुपये प्रतिकिलोपर्यंत हुरडा विकला गेला. यंदा पाऊस कमी पडल्याने हुरड्याचे उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

व्यापारी अण्णासाहेब शिंदे (नरसापूर) यांनी सांगितले की, दोन्ही गाव मिळून सुमारे ९०० एकर क्षेत्रापैकी ४५० ते ५०० एकरांवर हुरडा घेतला जातो. ज्वारीला पाणी कमी लागते; पण यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. अनेक गावांत पिण्यासाठी पाणी नाही. यामुळे आता शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी विकत आणून हुरडा जगविला आहे. एका एकरवर ८०० किलो हुरडा येत असतो. 

उत्पादनाची परिस्थिती लक्षात घेता यंदा २५० ते ३०० किलो हुरडा हाती येईल. मागील वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सुरुवातीला दररोज संपूर्ण नरसापूर गावातून २० ते २५ क्विंटल हुरडा विक्रीला येत असे. मात्र, यंदा ३ ते ४ क्विंटल हुरडा विक्रीला येत आहे. हा हुरडा विक्रीला गुलमंडीवर आणला जातो. गुलमंडीवर रविवारी २० ते २५ किलो हुरडा विक्रीला आला होता. विक्रेते राजू शिंदे (नरसापूर) यांनी सांगितले की, आज २५० रुपये किलोने हुरडा विकला जात आहे. मात्र, या भावात मागणी कमी आहे. 

हुरड्याला मागणी वाढणार शेतकरी प्रवीण पारधे (सारंगपूर) यांनी सांगितले की, मागील वर्षी हुरड्याला किलोमागे ६०० रुपये भाव मिळाला होता. यंदा टँकरचे पाणी आणून हुरडा जगविला जात आहे. पुढील महिन्यात मागणी वाढेल तर हुरड्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद