शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

कावीळ म्हणजे शरीरात हळूहळू पसरणारा ‘सायलेंट किलर’च; काय आहेत लक्षणे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 16:55 IST

जागतिक कावीळ दिन विशेष: लवकर निदान झाल्यास त्याला रोखता येते, उपचार करता येतो.

छत्रपती संभाजीनगर : ‘एखादी छोटीशी चूक आयुष्यभराचे दु:ख देऊ शकते...’ अगदी हेच सांगणारा आजचा दिवस म्हणजे जागतिक कावीळ दिन. शरीरात हळूहळू पसरणारा हा ‘सायलेंट किलर’ अजूनही अनेकांना माहिती नसलेला, वेळेत निदान न झाल्यास प्राणघातक ठरू शकणारा आजार आहे. परंतु, त्याचे लवकर निदान झाल्यास त्याला रोखता येते, उपचार करता येतो. रुग्ण बरेदेखील होतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.

दरवर्षी २८ जुलै रोजी जागतिक कावीळ दिन साजरा केला जातो. हिपॅटायटीस म्हणजेच कावीळ विषाणूंचे मुख्य प्रकार ए, बी, सी, डी, ई हे आहेत. हिपॅटायटीस ए आणि ई हे सहसा दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरतात, तर हिपॅटायटीस बी आणि सी संक्रमित रक्त किंवा शरीरातील द्रवपदार्थांद्वारे पसरतात. कावीळ शरीरात वर्षानुवर्षे कोणत्याही लक्षणांशिवाय राहू शकतो. यकृताला मूकपणे हानी पोहोचवत राहतो. अनेकदा लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

काय खबरदारी घ्याल?- उकळलेले अथवा फिल्टर केलेले पाणीच प्यावे.- उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळावे.-रक्तदान, इंजेक्शन यावेळी सजगतेने वागावे.- ‘कावीळ-ब’ च्या प्रतिबंधासाठी लस घ्यावी.- मद्यपान टाळणे, आरोग्यदायी आहार घ्यावा.

घाटीतील हिपॅटायटीस ओपीडीतील स्थिती- किती हिपॅटायटीस बी रुग्णांवर उपचार?: १३३६- हिपॅटायटीस बी व गरोदर महिला : ११८-हिपॅटायटीस सी पाॅझिटिव्ह रुग्ण : १३९-हिपॅटायटीस सी व गरोदर महिला : १

मद्यपान टाळा, आरोग्यदायी आहार घ्याहिपॅटायटीस सुरू होण्यापूर्वीच, न होऊ देण्याचा एक प्रभावी मार्ग आहे आणि तो म्हणजे लसीकरण. ‘हिपॅटायटीस बी’ ची लस खूप प्रभावी आहे. ती सर्व नवजात बालकांना तसेच जोखीम असलेल्या प्रौढांना दिली पाहिजे. मद्यपान टाळणे, आरोग्यदायी आहार, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे आणि लसीकरण करणे यासारख्या साध्या सवयी यकृताचे रक्षण करण्यात खूप मदत करू शकतात.- डॉ. उन्मेश टाकळकर, पोटविकार, कर्करोगतज्ज्ञ व एंडोस्कोपीक सर्जन

कावीळच्या रुग्णांसाठी ओपीडीघाटीतील मेडिसीन विभागातर्फे २०१९ पासून कावीळच्या रुग्णांसाठी ओपीडी सुरू आहे. ‘हिपॅटायटीस ए’ हा लिव्हरमध्ये घर करतो. त्यामुळे लिव्हर सोरायसिस होतो. ‘हिपॅटायटीस सी’ हाही लिव्हरवर परिणाम करतो. परंतु औषधोपचाराने ते पूर्ण बरे होऊ शकते. आपल्याकडे औषधोपचाराने अनेक रुग्ण निगेटिव्ह झाले आहेत.- डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसीन विभागप्रमुख, घाटी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य