शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

मोंढ्यातून जाधववाडीत स्थलांतरास व्यापारी राजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 18:23 IST

मोंढ्यातील ११९ व्यापाऱ्यांनी जाधववाडीत प्लॉट घेण्यासाठी गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे प्रत्येकी साडेतीन लाख रुपयांचे धनादेश सुपूर्द केले.

ठळक मुद्देयामुळे मोंढा स्थलांतराच्या दिशेने आज एक पाऊल पडले.

औरंगाबाद : मोंढ्यातील ११९ व्यापाऱ्यांनी जाधववाडीत प्लॉट घेण्यासाठी गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे प्रत्येकी साडेतीन लाख रुपयांचे धनादेश सुपूर्द केले. यामुळे मोंढा स्थलांतराच्या दिशेने आज एक पाऊल पडले. परिणामी, प्लॉट देण्यापूर्वीच बाजार समितीच्या तिजोरीत सव्वाचार कोटी जमा झाले आहेत. मात्र, सर्व शासकीय परवानग्या असलेला निर्विवाद प्लॉट दिला, तरच उर्वरित रक्कम देऊ, अशी अटही व्यापाऱ्यांनी घातली. 

मोंढ्यातील शेतीनियमित मालाच्या किरकोळ व होलसेल व्यवहाराचे जाधववाडीत स्थलांतराचे घोंगडे मागील १९ वर्षांपासून भिजत पडले आहे. मात्र, गुरुवारी मोंढ्यातील ११९ व्यापाऱ्यांनी कृउबा समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांच्याकडे धनादेश सोपवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार जाधववाडीतील गट नंबर ५ येथील जागेवर मोंढ्यातील ११९ व्यापाऱ्यांना प्लॉट देण्यात येत आहेत. १ जुलै रोजी मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी सोडत काढून प्लॉट वाटून घेतले. ठरल्याप्रमाणे पहिला ४ लाख रुपयांचा हप्ता कृउबाला द्यायचा होता. यापूर्वी मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी प्रत्येकी ५० हजार रुपये कृउबाकडे जमा केले आहेत. 

आज ५ रोजी सकाळी मोंढ्यातील जनरल किराणा मर्चन्टस् असोसिएशनचे संजय कांकरिया, नीलेश सेठी, राजेंद्र शहा, संचालक हरीश दायमा, प्रशांत सोकिया, विक्की सुराणा, मुन्ना चांदीवाल आदींनी बाजार समिती सभापती राधाकिशन पठाडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे धनादेश सुपूर्द केले. मात्र, त्याचसोबत काही अटी असलेले निवेदनही दिले. यात म्हटले आहे की, धनादेश वटल्यावर व्यापाऱ्यांना प्लॉट नंबर टाकून प्रत्येकाला अलॉटमेंट लेटर द्यावे. 

कृउबाने ३० मार्च २०१९ पर्यंत सर्व परवानग्यांसह निर्विवाद प्लॉट व्यापाऱ्यांच्या ताब्यात द्यावेत, असोसिएशनचे पत्र पाहूनच प्रत्येक व्यापाऱ्याच्या प्लॉटचे लीज डीड करावे आदी मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय जाधववाडीतील २० व्यापाऱ्यांनी प्रत्येकी ४ लाख रुपयांचा पहिला धनादेश बाजार समितीकडे सुपूर्द केला आहे. 

दीड वर्षात मोंढा स्थलांतर करणार ११९ व्यापाऱ्यांनी व जाधववाडीतील २० व्यापाऱ्यांनी दोन टप्प्यात रक्कम देण्याचे मान्य केले. दुसऱ्या टप्प्यात ७६ प्लॉट इतर व्यापाऱ्यांना देण्यात येतील. सर्व शासकीय परवानग्या मिळवून देण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. येत्या दीड वर्षात मोंढा स्थलांतर करू.- राधाकिशन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय