शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

सुसाट होणार प्रवास, जालन्याहून लवकरच धावेल इलेक्ट्रिक इंजिनसह ‘जनशताब्दी एक्स्प्रेस’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 15:39 IST

आता बदनापूरपर्यंत यशस्वी चाचणी : मनमाड ते बदनापूर १४१ कि.मी. रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते बदनापूरपर्यंत रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे धावण्याची चाचणीही यशस्वी झाली. आगामी महिनाभरात जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण होऊन इलेक्ट्रिक इंजिनसह जनशताब्दी एक्स्प्रेस धावेल, असा विश्वास रेल्वेच्या सूत्रांनी व्यक्त केला.

नव्या वर्षाच्या प्रारंभी म्हणजे जानेवारीत मनमाड ते छत्रपती संभाजीनगर या ९८ कि.मी.च्या लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ते जालन्यापर्यंतच्या विद्युतीकरणाच्या कामाला वेग देण्यात आला. यात आता बदनापूरपर्यंत म्हणजे आणखी ४३ कि.मी. रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले. छत्रपती संभाजीनगर ते बदनापूरपर्यंत शुक्रवारी इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे चालविण्याची चाचणीही घेण्यात आली. यावेळी ताशी १०० कि.मी.च्या वेगाने ही रेल्वे धावली. चाचणी यशस्वी झाली असून, आगामी महिनाभरात जालन्यापर्यंतचे काम पूर्ण होईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मनमाड ते बदनापूर या १४१ कि.मी. रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. आता जालन्यापर्यंतच्या जवळपास २० कि.मी. मार्गाचे विद्युतीकरण बाकी असल्याचेही सांगण्यात आले.

मालगाड्यांना इलेक्ट्रिक इंजिन, नियमित रेल्वेंना प्रतीक्षाछत्रपती संभाजीनगरहून मालगाड्या इलेक्ट्रिक इंजिनसह धावत आहेत. आता सर्वांचे लक्ष नियमित रेल्वेंकडे लागले आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस ही जालन्याहून धावते. त्यामुळे ही रेल्वे सर्वप्रथम इलेक्ट्रिक इंजिनसह धावेल, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. त्यासाठी जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादJalanaजालनाtourismपर्यटन