शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

जालना रोड तीन तास ठप्प

By admin | Updated: April 28, 2016 00:21 IST

औरंगाबाद : रामा आणि अ‍ॅम्बेसिडर हॉटेलमध्ये होणारे लग्न व इतर समारंभाच्या वेळी रस्त्यावर करण्यात येणाऱ्या पार्किंगमुळे शहराची ‘लाईफ लाईन’ समजल्या जाणाऱ्या जालना रोडवर सतत वाहतुकीची कोंडी होत आहे.

औरंगाबाद : जालना रोडवरील रामा आणि अ‍ॅम्बेसिडर हॉटेलमध्ये होणारे लग्न व इतर समारंभाच्या वेळी रस्त्यावर करण्यात येणाऱ्या पार्किंगमुळे शहराची ‘लाईफ लाईन’ समजल्या जाणाऱ्या जालना रोडवर सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. बुधवारी सायंकाळी सुमारे तीन तास मोठी कोंडी झाली. दोन्ही बाजूने दूर-दूरपर्यंत वाहने खोळंबली होती. त्यामुळे वाहनचालकांचे चांगलेच हाल झाले.शहराचा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या जालना रोडवर रामा इंटरनॅशनल आणि अजिंठा अ‍ॅम्बेसिडर ही दोन्ही पंचतारांकित हॉटेल्स् आहेत. लग्न व विविध समारंभांसाठी येथील लॉन भाड्याने देण्यात येते; परंतु या समारंभासाठी येणाऱ्या अतिथींच्या वाहन पार्किंगसाठी या दोन्ही हॉटेलकडे पुरेशी जागा उपलब्ध नाही. या दोन्ही हॉटेलच्या पार्किंगच्या जागेवर गार्डन आणि लॉन्स करण्यात आलेले आहे. त्यामुळे येथे लग्न समारंभासाठी आलेले अतिथी थेट रस्त्याच्या कडेलाच दुचाकी, चारचाकी वाहने उभी करतात. बुधवारी अ‍ॅम्बेसिडर हॉटेलच्या गार्डनमध्ये विवाह समारंभ होता. नित्याप्रमाणे आलेल्या अतिथींनी आपली वाहने हॉटेलच्या गेटसमोरच उभी केली. पाहता पाहता पार्किंग केलेली वाहने थेट जालना रस्त्यावर आली. त्यामुळे सायंकाळी सहा वाजेपासून वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात झाली. एक तर सायंकाळी सर्व कार्यालये सुटल्यानंतर जालना रोडवर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे सात वाजेनंतर तर हॉटेलसमोर पार्क केलेल्या वाहनांनी केलेल्या अडथळ्यांमुळे वाहतुकीचा वेग इतका मंदावला की, एक-दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल तीन तास म्हणजेच हा संपूर्ण विवाह समारंभ संपेपर्यंत वाहतुकीची कोंडी कायम होती. वाहनचालकांचे या कोंडीमुळे प्रचंड हाल झाले. नित्याचीच बाबया दोन्ही हॉटेलने पार्किंगच्या जागाच गायब केल्यामुळे येथे रस्त्यावर होत असलेल्या पार्किंगमुळे सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या अतिथींची नीट वाहने उभी करावी, यासाठी हॉटेल व्यवस्थापन कोणतीही काळजी घेताना दिसत नाही. दर दोन-तीन दिवसाआड रामा, अ‍ॅम्बेसिडर हॉटेलचे लॉन काही ना काही समारंभासाठी भाड्याने दिले जात आहेत. त्यामुळे शहराच्या लाईफ लाईनची कोंडी आणि वाहनचालकांचे हाल ही नित्याचीच बाब बनली आहे. हॉटेलचे म्हणणे...या संदर्भात अ‍ॅम्बेसिडरचे सरव्यवस्थापक निर्मल त्रिवेदी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हॉटेलमध्ये पुरेशी पार्किंग असून ती पूर्णपणे भरल्यामुळे आम्ही पार्किंग बंद केली. त्यामुळे रस्त्यावर लावलेल्या गाड्यांसाठी आम्ही जबाबदार नाही. रामा इंटरनॅशनलच्या व्यवस्थापनाशी मात्र संपर्क होऊ शकला नाही. कारवाई करणाररामा इंटरनॅशनल आणि अजिंठा अ‍ॅम्बेसिडर या दोन्ही हॉटेलांमधील पार्किंगच्या जागेचा वापर दुसऱ्याच कारणासाठी होताना दिसून येत आहे. या दोन्ही हॉटेलने त्यांच्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी हॉटेलच्या आवारातच पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे. या हॉटेलच्या पार्किंगच्या जागेबाबत आम्ही महानगरपालिकेकडे माहिती मागविणार आहोत. त्यानंतर हॉटेलविरुद्ध कारवाई करण्यात येईल. - खुशालचंद बाहेती, सहायक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा.