शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

जालनारोड सहापदरी होणार; पाऊणशे कोटींतच कामे करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 19:49 IST

आता रोड सहापदरी करणे आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम यातून करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपेव्हर ब्लॉक बसविणार

औरंगाबाद : जालनारोडचे काम ४०० कोटींहून २४५ कोटींत करा, नंतर ते १०४ कोटींमध्येच करण्याचे आदेश देण्यात आले आणि आता ७६ कोटींतच ते काम गुंडाळा, असा निर्णय केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने घेतल्यामुळे त्या प्रकल्पात तिसऱ्यांदा सुधारणा करून ३० ते ४० कोटींची दांडी मारली. आता रोड सहापदरी करणे आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम यातून करण्यात येणार आहे. 

लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तामुळे गुरुवारी दिशा समितीच्या बैठकीत चर्चा झाली. समितीचे अध्यक्ष खा.चंद्रकांत खैरे यांनी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांना याप्रकरणी माहिती विचारली. बीड बायपासचे काम एनएचएआयच्या अंतर्गत येण्यात शासकीय अडथळा निर्माण झाल्याचे सांगून बीड बायपासचा ३८९ कोटींचा प्रकल्पच रद्द करण्यात आला आहे. जालना रोडचे काम ७६ कोटींतच होणार आहे.

खा.खैरे म्हणाले, जालनारोडचे नेमके काम कसे होणार आहे. लोकमतमध्ये बातमी वाचल्यानंतर समजले की, ४० कोटींपर्यंत अनुदान एनएचएआयने कमी केले आहे. दिल्लीतील बैठकीत रोडचे काम करणार असल्याचे सांगितले जाते, त्यानंतर पुढे काही होत नाही. वेळोवेळी बैठका, पत्रव्यवहार केला, पार्लमेंटरी समितीसमोर मुद्दा आला, पण तरीही काही होत नाही. अकोला, मूर्तिजापूर, अमरावती, नाशिकमधील कामे एनएचएआयच्या अखत्यारीत नसताना केली, मग औरंगाबादला सापत्न वागणूक का दिली जाते. यावर संचालक गाडेकर म्हणाले, निर्णय का होत नाही, हे सांगणे अवघड आहे. जालनारोडचे रुंदीकरण होणार नाही. तसेच त्यावर बीटी सरफेसचे काम एनएचएआय करणार नाही. पेव्हर ब्लॉकसह एकेक पदर दोन्ही बाजूंनी वाढविण्यात येईल. रोडची लेव्हल एकच असेल, सहापदरी रोड होईल. दौलताबाद येथील गेटजवळील वळण रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. 

जालनारोडच्या कामाचा प्रवास असा...डिसेंबर २०१५ मध्ये जालना रोड आणि बीड बायपाससाठी ७८९ कोटी रुपयांची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानंतर जून २०१८ मध्ये गडकरी यांनी दोन्ही प्रकल्पांसाठी २४५ कोटींची घोषणा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रपरिषदेत केली. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १०४ कोटींतून जालनारोडचे काम करण्याचा अंतिम निर्णय  झाल्यानंतर आता जानेवारीत ७६ कोटींतूनच काम करण्याच्या सूचना आहेत. 

जालनारोडसाठी आजवरच्या घोषणा डिसेंबर    २०१५    ४०० कोटीजून         २०१८    २४५ कोटीडिसेंबर    २०१८    १०४ कोटीजानेवारी    २०१९    ७६ कोटी 

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादfundsनिधी