शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जय हो भोलेनाथ! महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:59 IST

भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत दर्शन होण्यासाठी जाण्याचा व येण्याचा वेगळा मार्ग करण्यात आला आहे. 

- सुनील घोडकेखुलताबाद: महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी मंगळवारी रात्री १० वाजेपासूनच भाविकांची गर्दी झाली. भाविकांना सुरळीत दर्शन होण्यासाठी जाण्याचा व येण्याचा वेगळा मार्ग करण्यात आला आहे. 

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर ओळखले जाते. महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासून देशभरातून भाविक वेरूळनगरीत दाखल झाले आहे. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर देवस्थान, महसूल व पोलीस प्रशासनाने चा व्यवस्था केली आहे. भाविकांचे रांगेत सुटसुटीत दर्शन व्हावे म्हणून प्रशासन परिश्रम घेत आहे. रात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. भाविकांसाठी पाणी, महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, वेरूळ, खुलताबाद व परिसरातील भाविकांना महाशिवरात्रीला दर्शनासाठी आधारकार्ड दाखवून पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.

आज दुपारी ४ वाजता मंदिरातून सवाद्य पालखी मिरवणूक शिवालय तीर्थकुंडावर जाणार असून त्याठिकाणी महापुजा होऊन परत मंदीरात येणार आहे. आज रात्री १२ वाजता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांच्या हस्ते शासकीय महापुजा होणार आहे. रात्रीपासून उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड, तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे मंदीर परिसरात तळ ठोकून असून त्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन मिळत आहेत.

येण्याचा आणि जाण्याचा मार्ग वेगळावेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीर असून महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते महाशिवरात्रीला राज्य व परराज्यातून दर्शनासाठी येत असल्याने प्रथमच दर्शनासाठी मुख्य गेटने प्रवेश होऊन दर्शन झाल्यानंतर मंदीराच्या पाठीमागून नवीन गेट पुरातत्व विभागाच्या सहकार्याने तयार करून त्या मागील गेटने भाविक बाहेर पडणार असल्याने गाभा-यात सभामंडपात भाविकांची गर्दीच होणार नसल्याने सुलभ दर्शन होणार आहे. त्याचप्रमाणे बाहेरील दर्शन रांग झिकझँक पध्दतीने बँरीकेट लावण्यात आले आहे, उन्हापासून संरक्षण होण्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMahashivratriमहाशिवरात्री