शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

शांतिगिरी महाराजांच्या भेटीला इम्तियाज जलील, संदीपान भुमरे; अनेक अपक्ष उमेदवारही दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 17:46 IST

जय बाबाजी भक्त परिवाराचा अद्याप कुणालाही पाठिंबा नाही, १० मे रोजी करणार भूमिका जाहीर

खुलताबाद ( छत्रपती संभाजीनगर) : वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या आश्रमात आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे, एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांची भेट घेतली. जय बाबाजी भक्त परिवाराचा औरंगाबाद लोकसभा क्षेत्रात मोठा प्रभाव आहे. यामुळे जलील आणि भुमरे यांनी शांतिगिरी महाराज यांच्या भेटीस महत्व आले आहे.

वेरूळ येथील आश्रमात आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जय बाबाजी भक्त परिवाराची राजकीय दृष्ट्या निर्णय घेण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांची वेरूळ येथे उपस्थिती होती. दरम्यान औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हे शांतिगिरी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले. तर याचवेळी एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील देखील आश्रमात दाखल झाले. दोन्ही उमेदवारांनी महाराजांची भेट घेतली. या दोघांसह अनेक अपक्ष उमेदवार देखील महाराजांच्या भेटीस येत असल्याने वेरूळचा आश्रम राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू बनला आहे. 

पाठिंबा कोणाला? १० मे रोजी ठरणार आज झालेल्या बैठकीमध्ये सात मतदारसंघांमध्ये पाठिंबा कोणास देयचा याचा निर्णय अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर १० तारखेला घेण्यात येणार असल्याचे ठरले आहे. सर्व प्रसिद्धी माध्यमांना १० तारखेला अधिकृतपणे याची माहिती जय बाबाजी भक्त परिवाराकडून कळवण्यात येणार आहे. आज कुठल्याही उमेदवारा संदर्भात निर्णय झालेला नाही, असे राजकीय समितीचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी कळविले आहे. यावेळी जिल्हा संपर्क सेवक शेकनाथ होळकर, जनार्दन रिठे ,राजाभाऊ पानगव्हाणे, राजू चव्हाण कवराजी पाटील, श्रीकांत बोडके, रमेश सागजकर, संदीप मोडके आदीसह जय बाबाजी भक्त परिवाराच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आश्रमात लोकसभा उमेदवारांचा राबताशांतिगिरी महाराज यांची आज दुपारी औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे, एमआयएमचे इम्तियाज जलील, अपक्ष उमेदवार डॉ. जीवन राजपूत, जे. के. जाधव, संजय भास्कर शिरसाट यांनी भेट घेतली. तसेच शिर्डी लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार भारत संभाजी भोसले यांनी देखील आज शांतिगिरी महाराजांची भेट घेतली.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Imtiaz Jalilइम्तियाज जलीलSandipan Bhumreसंदीपान भुमरेShantigiri Maharajशांतिगिरी महाराज