शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जवान शहीद...फकिराबादवाडी शोकसागरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:06 IST

शेवटचे संभाषण : माझ्या दोन्ही चिमुकल्यांची काळजी घ्या

वैजापूर : गावचा वीरपुत्र किरण पोपटराव थोरात (३१) यांना वीरमरण आल्याचे कळताच फकिराबादवाडीसह तालुक्यावर शोककळा पसरली. आपल्या लाडक्या भूमिपुत्राच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गुरुवारी सकाळपासूनच फकिराबादवाडीतील थोरात यांच्या शेतवस्तीवर गर्दी केली. शुक्रवारी सकाळी किरण थोरात यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी गावात एक तास ठेवण्यात येणार आहे.किरण थोरात यांचे शेतवस्तीवर घर असून, तेथे त्यांचे आई-वडील, भाऊ, पत्नी, पाच महिन्यांचा मुलगा श्लोक व मोठी मुलगी श्रेया राहते. किरण यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण लाडगाव (ता. वैजापूर) येथील न्यू हायस्कूलमध्ये तर बारावीपर्यंतचे शिक्षण वैजापूरच्या विनायकराव पाटील महाविद्यालयात झाले होते. २ मार्च २०१३ रोजी येवला तालुक्यातील सायगाव येथील आरती यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर ते सैन्यदलात भरती झाले.जानेवारीत आले होते घरीजानेवारी महिन्यात ते पंधरा दिवसांच्या सुट्टीवर घरी आले होते. त्यांना वीरमरण आल्याची धक्कादायक बातमी कळताच संपूर्ण कुटुंब शोकमग्न झाले. किरण यांचा मोठा भाऊ अमोल हा शेती करतो. किरण हेसुद्धा सुटीवर घरी आल्यानंतर शेतीकामात मदत करत असे, असे त्यांच्या कुटुंबियांनी साश्रूनयनांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा सैनिक अधिकारी जाधव, वैजापूरच्या तहसीलदार सुमन मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, वीरगावचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे, जि. प. सदस्य रमेश बोरनारे, पंकज ठोंबरे, बाबासाहेब जगताप, रमेश सावंत आदींनी फकिराबादवाडीत धाव घेऊन थोरात कुटुंबियांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला.एक दिवस आधीच झाले होते बोलणेकिरण थोरात हे आपल्या वडिलांना काका या नावानेच बोलवीत होते. मंगळवारी किरण यांनी मोबाईलवरून आई, वडील व पत्नीला फोन करून घरची खुशाली विचारली होती. तसेच काश्मीरमध्ये परभणीचा जवान शहीद झाल्यापासून सीमेवर तणाव आहे, त्यामुळे मला फोन करण्यास वेळ मिळणार नाही. तसेच माझ्या दोन्ही चिमुकल्यांची काळजी घ्या, असे शेवटचे संभाषण किरण यांनी आपल्या कुटुंबासोबत केले होते.वडिलांची बुलेटची इच्छा केली पूर्णवडिलांना बुलेट गाडी घेऊन देण्याचे किरण थोरात यांचे सैन्यात भरती झाल्यापासून स्वप्न होते, ते स्वप्न त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच सुटीवर आले असताना पूर्ण केले. वडिलांना काहीही न सांगता त्यांना औरंगाबादला नेले. तेथील शोरूममधून नवीन बुलेट गाडी घेऊन ती वडिलांना ‘गिफ्ट’ दिली होती.

 

 

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSoldierसैनिक