शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

‘दख्खनचा ताज’च्या संरक्षक भिंतीत गूळ, डिंक, उडदाची डाळ, कशासाठी माहितेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 18:57 IST

मकबरा परिसरात संवर्धनाचे काम सुरू : ऐतिहासिक भिंत पुन्हा एकदा उजळतेय

छत्रपती संभाजीनगर : स्वयंपाक घरात वापरला जाणारा गूळ, डिंक, मेथी, उडदाच्या डाळीसह अनेक पदार्थांचा वापर करून जगप्रसिद्ध ‘दख्खनचा ताज’ म्हणजे बीबी का मकबऱ्याच्या संरक्षक भिंतीची उभारणी केली आहे. अनेकांना कदाचित हे माहीत नसेल. पण, हे खरे असून, सध्या याच संरक्षक भिंतीच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘त्या’ काळी जे पदार्थ वापरून ही भिंत साकारली, त्याच पदार्थांचा, साहित्यांचा वापर केला जात आहे. त्यातून ही ऐतिहासिक भिंत पुन्हा एकदा उजळून निघत आहे.

बीबी का मकबऱ्याच्या चारही बाजूने संरक्षक भिंत आहे. ही भिंत कमानदार, नक्षीदार आणि जाळीची आहे. गेल्या अनेक वर्षांच्या काळात या भिंतीची जागोजागी दुरवस्था झाली. ही दुरवस्था दूर करण्याचे काम भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने हाती घेतले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधीक्षक डाॅ. शिवकुमार भगत यांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धनाचे काम केले जात आहे. संरक्षण सहायक संजय रोहणकर यांच्या निगराणीखाली संरक्षक भिंतीच्या संवर्धनाचे काम सुरू आहे.

कोणकोणत्या साहित्यांचा वापर?संवर्धनाच्या कामासाठी थेट सिमेंट, चुना यांचा वापर करता येत नाही. ज्या मूळ साहित्यांचा वापर करून ऐतिहासिक वास्तू उभी राहते, त्याच पदार्थांचा वापर केला जातो. संरक्षक भिंतीसाठी चुना, विटांचा चुरा, गूळ, डिंक, ज्यूट, अंबाडी, उडदाची डाळ, मेथी, बाल हिरडा, गुगुळ, सिरस आदी एकत्रित केले जात आहेत. त्याचा वापर प्लास्टर, दगडी जाळी तयार करण्यासाठी होत आहे. संरक्षक भिंतीवरील तुटलेल्या छोट्या मिनारच्या जागी नव्याने तयार केलेले मिनार बसविण्यात येत आहे.

मिनारचे कामही लवकरचमकबऱ्याच्या चारही मिनारचे टप्प्याटप्प्यात संवर्धन केले जाणार आहे. मिनारच्या प्लास्टरसाठीही चुन्यासह गूळ डिंक, उडीद डाळ, विटांची पावडर आदी वापरण्याचे नियोजन आहे. आता लवकरच हे काम सुरू होणार असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Bibi-ka-Maqbaraबीबी का मकबराchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण