शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
2
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
3
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
4
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
5
मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू
6
दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त;  विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
7
झारखंडमधील ACB पथकाने अटक केलेला अमित साळुंखे कोण?; संजय राऊतांचा शिंदे पिता-पुत्रावर खळबळजनक आरोप
8
घटनेच्या उद्देशिकेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवणार का?; केंद्र सरकारने संसदेत दिले उत्तर
9
इलेक्ट्रिक टुव्हीलरनंतर आता थ्री-व्हीलर! 'या' कंपनीने बाजारात उतरवले रिक्षाचे २ मॉडेल्स; किंमत आणि फीचर्स काय?
10
श्रावण शुक्रवार: नैवेद्याला करा 'कोकोनट मलई खीर'; तांदळाच्या खिरीला खोबऱ्याचा ट्विस्ट!
11
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन
12
थायलंड-कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच; आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू; UN'ने बोलावली आपत्कालीन बैठक
13
NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या
14
पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य
15
आता नाशिकची वाईन अन् केरळची ताडी थेट ब्रिटनमध्ये मिळणार! यूकेमध्ये विक्रीचा मार्ग मोकळा
16
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
17
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड
18
ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
19
OYO कांड! विवाहित प्रेयसीसोबत पकडले, प्रियकराने विवस्त्रावस्थेतच हायवेवरून धूम ठोकली... 
20
लिव्ह इनमधील २४ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; सैयारा सिनेमा पाहून काय घडले? पोलीस हैराण 

विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत सोहळ्यात जगदीप धनखड यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:30 IST

या दीक्षांत सोहळ्यात एकूण ५६ हजार १२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५वा दीक्षांत सोहळा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. २२) दुपारी ३:२० वाजता सुरू होणार आहे. या दीक्षांत सोहळ्यात एकूण ५६ हजार १२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी, अधिष्ठाता डॉ. महेंद्र शिरसाठ, डॉ. वैशाली खापर्डे, डॉ. वीणा हुंबे, डॉ. कैलास पाथ्रीकर, डॉ. मुस्तजिब खान आणि डॉ. संजय शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू डॉ. फुलारी म्हणाले, दीक्षांत सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती जगदीप धनखड उपस्थित असणार आहेत. कुलपती सी. पी. राधाकृष्णन हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी व्यासपीठावर उपराष्ट्रपतींसह त्यांची पत्नी, कुलपती, डॉ. भागवत कराड आणि कुलगुरू अशी पाच जणांचीच आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपतींची सुरक्षा अतिशय कडक असल्यामुळे अनेक बाबींवर निर्बंध आल्याचेही स्पष्ट झाले आहे. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी एकूण ३० समित्यांची स्थापना केलेली आहे.

१०६ जणांना विद्यावाचस्पतीदीक्षांत समारंभात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ व मार्च-एप्रिल २०२४ या परीक्षेत उत्तीर्ण पदवीधारकांना पदव्यांचे वितरण होईल. या दोन्ही परीक्षेत पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थी आणि १४ जून २०२४ ते ८ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान पीएच.डी. प्राप्त करणाऱ्या १०६ संशोधकांनाही पदवी मिळेल. पदवीधरांची संख्या ४२ हजार ६६६, पदव्युत्तर पदवी १३ हजार १८७, एम.फिल १६ व पीएच.डी.धारक १०६ जण, अशा एकूण ५६ हजार १२२ विद्यार्थ्यांना पदवी वितरण होईल.

चार इमारतींचे ऑनलाइन भूमिपूजनउपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते पीएम उषा प्रकल्पांतर्गत चार इमारतींचे ऑनलाइन भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये ‘स्ट्रेस बस्टर रिक्रेशन फॅसिलिटी सेंटर’, सेंटर फॉर फोक अँड कल्चरल स्टडीज ऑफ मराठवाडा, स्टुडंट्स फॅसिलीट इन लायब्ररी अँड रीडिंग रूम आणि सेंटर फॉर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या चार इमारतींचा समावेश आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर