शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
5
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
6
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
7
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
8
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
9
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
10
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
11
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
12
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
13
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
14
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
15
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
16
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
17
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
18
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
19
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
20
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

भाविकांनी ओढला जगन्नाथाचा रथ

By admin | Updated: January 17, 2016 23:56 IST

औरंगाबाद : ‘हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा, कृष्णा हरे हरे... हरे रामा, हरे रामा, रामा, रामा हरे हरे’ असा अखंड महामंत्र जपत शेकडो भाविक जगन्नाथाचा रथ ओढत होते.

औरंगाबाद : ‘हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा, कृष्णा हरे हरे... हरे रामा, हरे रामा, रामा, रामा हरे हरे’ असा अखंड महामंत्र जपत शेकडो भाविक जगन्नाथाचा रथ ओढत होते. या रथयात्रेत युवकांची संख्या सर्वाधिक होती. त्यात आयटी क्षेत्रातील युवक अधिक होते. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) संस्थेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शहरात रविवारी दुपारी जगन्नाथ रथयात्रा भक्तिभावात काढण्यात आली. या रथोत्सवासाठी जगन्नाथ, सुभद्रा व बलराम यांच्या मूर्ती खास ओडिसाहून आणण्यात आल्या होत्या. जगन्नाथाचा खास रथ पंढरपूर येथून आणण्यात आला होता. फुलांच्या सजावटीमध्ये रथात मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. शहागंजमधील चौकात रथ उभा करण्यात आला होता. आधी एकाने रथमार्ग झाडून काढला... झाडूलाही आकर्षकरीत्या सजविण्यात आले होते. नंतर सुरेख रांगोळी काढण्यात आली. दुपारी १२ वाजता शंखनाद करण्यात आला आणि भगवंतांसमोरील पडदा हटविण्यात आला. यानंतर आरती झाली. औरंगाबाद इस्कॉनचे अध्यक्ष डॉ. रोहिणी प्रिया प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखविला आणि रथयात्रेला सुरुवात झाली. रथाच्या दोन्ही बाजूंना दोरखंड लावण्यात आले होते. रथाच्या उजव्या बाजूने महिला, तर डाव्या बाजूने पुरुष भाविक दोरखंड हातात घेऊन रथ ओढत होते. जगन्नाथाचा रथ ओढण्याला मोठे महत्त्व आहे. यामुळेच रस्त्यावरून जाणारे नागरिकही थोडा वेळ तरी रथ ओढत होते. ऋषिकेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली टाळ-मृदंगाच्या तालावर ‘हरे रामा, हरे कृष्णा’ हा महामंत्र अखंडित जपत तल्लीन होऊन युवक नृत्यही करीत होते. भाविक अधूनमधून रथावर पुष्पवृष्टी करीत होते... सराफा रोड, सिटीचौक, मछली खडक, गुलमंडी, गोमटेश मार्केट, पैठणगेट, टिळकपथ, औरंगपुरा, निराला बाजार, नागेश्वरवाडीमार्गे जगन्नाथाचा रथ खडकेश्वर मंदिर मैदानावर जाऊन पोहोचला. रथयात्रेच्या यशस्वीतेसाठी मोहिंदर बखारिया, अ‍ॅड. ओमप्रकाश साबू, राजन नाडकर्णी, प्रकाश राणा, राजेश भारुका, प्रा. युवराज गिरबने, अजित दळवी, श्रीकांत जोगदंड, गणपत कुरुडे, राजेश वर्मा, शेख लाला (नारेगावकर) आदींनी परिश्रम घेतले.