शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
4
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
5
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
6
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
7
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
8
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
9
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
10
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
11
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
12
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
13
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
14
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
15
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
16
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
17
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
18
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
19
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

निवडणूक लढविण्याचे जाहीर करून जाधवांचे खैरेंना खुले आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 20:40 IST

येणारी लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर करून त्यांनी खैरेंना शिवराळ भाषेत खुले आव्हान दिले.

औरंगाबाद : शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. हर्षवर्धन जाधव यांनी पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त खा. चंद्रकांत खैरेंवर तुफान शब्दहल्ला चढवून राजकीय सीमोल्लंघन केले. येणारी लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर करून त्यांनी खैरेंना शिवराळ भाषेत खुले आव्हान दिले.

वाकी संस्थानचे सुखदेव महाराज यांच्या हस्ते जालना रोड, समर्थनगर येथील पक्षकार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी पाऊणतास भाषणात शिवसेना पक्षप्रमुख, मनसेप्रमुख यांच्यासह खा. खैरे यांना टीकेचे लक्ष्य करीत आरोपांच्या फैरी झाडल्या. यावेळी माजी आ. तेजस्विनी जाधव, संजना जाधव, आदित्यवर्धन जाधव आदींची उपस्थिती होती. 

आ. जाधव यांनी खा. खैरे यांना वेगवेगळी विशेषणे देऊन त्यांचा आवाज काढून टीका केली. शहरात कचरा पेटला आहे, पाणीपुरवठा होत नाही, रस्त्यांची वाट लागलेली असताना ‘जय महाराष्ट्र’ म्हणायचे, कडक कपडे घालून मिरवायचे, स्वत:ला हिंदुरक्षक म्हणवून घ्यायचे आणि मातोश्रीवर डोके टेकायचे या पलीकडे त्यांनी काय केले. आदित्य ठाकरे यांच्यादेखील ते पाया पडले.

हिंदूंसाठी ते कितीदा तुरुंगात गेले हे दाखवून द्यावे. तुरुंगवास दुसऱ्यांनी भोगायचा आणि सत्तेत्त यांनी बसायचे. दोन तास क्रांतीचौक पोलीस ठाण्यात यांनी हिंदूंसाठी तुरुंगात बसावे. मी खैरेंच्या पायाखालून जाईन, असे आव्हान देत आ. जाधव म्हणाले, मला खा. खैरे वेडा म्हणतात; परंतु वेडी माणसेच क्रांती करतात. मतदारसंघात मी १५० मंदिर सभागृहे बांधली. खैरेंनी जाहीरपणे सांगावे किती मंदिर सभागृहे बांधून दिली. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावरही आ. जाधव यांनी तोंडसुख घेतले.

ते म्हणाले की, ठाकरे दिवसभर सनसन भाषणातून झोडपायचे आणि संध्याकाळी कुणी भेटले की, पंक्चर व्हायचे. त्यामुळे तेथेही विचार जुळले नाहीत. याप्रसंगी १४ वर्षीय आदित्यवर्धनने केलेले भाषण लक्षवेधी ठरले. त्याने एकेक करून शहरातील समस्यांचा पाढा मांडत शिवस्वराज्य पक्षाची भूमिका मार्मिकपणे मांडली.

सत्तेला लाथ मारायला हवी होतीशिवसेनेने मराठा आरक्षणासाठी सत्तेला लाथ मारून बाहेर पडणे गरजेचे होते. मी आरक्षणाच्या बाजूने बोललो, तर माझे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. पक्षशिस्त मोठी असते, असे सांगून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. साहेब आले, साहेब उठले, साहेब बसले, अशा पक्षशिस्तीपेक्षा तिथे न राहिलेले बरे. त्यामुळे सामान्यांसाठी सामन्य विचारांचा पक्ष काढला. पक्षशिस्त म्हणून काहीच बोलायचे नाही आणि मातोश्रीवर जाऊन हुजरेगिरी करायची. शिवसेनेत हुजरेगिरी करणाऱ्यांना महत्त्व आले आहे. शिवसेनेचा जन्म लुंगी-पुंगीवाल्यांच्या विरोधात झाला. शिवसेनाप्रमुखांनी पक्ष वाढविला. आता पक्षात हुजरेगिरी वाढल्यामुळे पक्षाची वाट लागल्याचा घणाघाती हल्ला जाधव यांनी चढविला.

सर्व काही सेंटिंग करतातखैरे दर शनिवारी भद्रा मारुती, शनिशिंगणापूरला जातात. दुसऱ्यांच्या कलेचे ओझे वाहतात. खासदाराची चारित्र्यसंपन्नता चांगली असली पाहिजे. लोक त्यांच्यापाठीमागे काहीही बोलतात. दंगली करून आता खासदार होता येणार नाही. काँगे्रस, भाजप, एमआयएमचे उमेदवार मॅनेज करतात. एमआयएमचे खा. ओवेसी यांच्याकडे हैदराबादाला जाऊन भेटतात. स्वपक्षातदेखील तिकिटे मॅनेज करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. अर्धशिक्षित माणूस कितीवेळा निवडून देता, आता बस्स झाले, त्या ग...ड्या...आणि दिल्लीत जाऊन ड्रॉव... ड्रॉव करणाऱ्यापेक्षा मी चांगले काम करू शकतो, असे बोलून खैरेंना खुले आव्हान देत जाधव यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याचे जाहीर केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवChandrakant Khaireचंद्रकांत खैरे