शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘तो मी नव्हेच’ ते ‘तो मीच’; फरार आरोपींच्या यादीत सहायक सरकारी वकील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 14:58 IST

शिवसेनेने काही वर्षांपूर्वी केलेल्या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांवर  क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

ठळक मुद्देन्यायालयाने त्यांच्याविरुद्ध समन्स आणि नंतर अटक वॉरंट काढले.

औरंगाबाद : शहर पोलिसांच्या फरार आरोपीच्या यादीत सहायक सरकारी वकिलाचे नाव आहे. पोलिसांनी त्या वकिलाला बोलावून घेतले, तेव्हा वकिलाने ‘तो मी नव्हेच’, अशी भूमिका घेतली. पोलिसांनी पुरावे सादर करताच  त्यांनी ‘तो मीच आहे’, अशी कबुली दिली. 

शिवसेनेने काही वर्षांपूर्वी केलेल्या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांवर  क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या आंदोलनातील कार्यकर्त्यांना अटक करून पोलिसांनी त्यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, आंदोलकांपैकी एक राजू पहाडिया हे न्यायालयात हजर झाले नाहीत. न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध समन्स आणि नंतर अटक वॉरंट काढले. एवढेच नव्हे तर पहाडिया हे सापडत नाहीत, असा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले. 

फरार आरोपींची यादी प्राप्त झाल्यानंतर पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी राजू पहाडिया यांना शोधण्याचे आदेश क्रांतीचौक पोलिसांना दिले. तपासाअंती पोलिसांच्या यादीतील फरार आरोपी जिल्हा न्यायालयातील  सहायक सरकारी वकील राजू पहाडिया हेच असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना बोलावून विचारणा केली तेव्हा सुरुवातीला त्यांनी ‘तो मी नव्हेच’, अशी भूमिका घेतली. पोलिसांनी पुरावे सादर केल्यावर, मी तेथे आंदोलकांचा वकील म्हणून हजर होतो, अशी सफाई दिली. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर होऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याची माहिती सूत्राने दिली.

फरार आरोपींचा शोध घेत असताना आम्हाला सरकारी वकील आणि सरकारी अधिकाऱ्यांची नावेही दिसली. अशा लोकांना न्यायालयात हजर करून यादीतील आरोपींची संख्या कमी करण्यावर आमचा भर आहे. -  निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त

टॅग्स :advocateवकिलAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी