शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बहुजन सुखाय नव्हे दुखाय...गर्भवतीसह सहा महिलांना रात्री बसमध्येच करावा लागला मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 15:35 IST

बस निकामी झाल्याचे आगाराला कळवूनही पर्यायी बस पाठविली नाही.

सोयगाव (औरंगाबाद ) : सोयगाव आगाराची औरंगाबाद-अंधारी-पाचोरा ही बस मंगळवारी सायंकाळी शेलगाव-नाचनवेल रस्त्यावर निकामी झाल्यामुळे एका गर्भवती महिलेसह ६ महिलांना रात्रभर बसमध्येच मुक्काम करण्याची वेळ आली. बस निकामी झाल्याचे आगाराला कळवूनही पर्यायी बस पाठविली नाही. या प्रकाराबाबत प्रवाशांनी रोष व्यक्त केला आहे. 

सोयगाव आगाराची औरंगाबाद-अंधारी-पाचोरा ही एकमेव बस ( एम. एच-२१ बी.एल-२१९८)औरंगाबाद स्थानकावरून दुपारी १ वा. सुटली . ही बस ५ वाजता नाचनवेलहून निघाली व रस्त्यातच निकामी झाली. चालक, वाहकाने बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळ झाली तरीही बस सुरू झालीच नाही. यामुळे वाहक आर. एम. गाढे यांनी सोयगाव बस आगाराला दूरध्वनीवरून रिलीफ बस पाठविण्याची विनंती केली.

सिल्लोड आगार जवळ असल्याचे कारण सांगून सोयगाव आगारातील प्रमुखांनी सिल्लोडला दूरध्वनी करून रिलीफ बससेवा व दुरुस्ती पथकाला पाचारण करण्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत सिल्लोड आगाराचे दुरुस्ती पथक आलेच नाही.बसमधील ४० प्रवाशांनी  बसभाडे परतीची मागणी केली. काही प्रवाशांना वाहकाने ११४० रुपये परत केले. त्यामुळे काहींनी दुचाकी तसेच ट्रॅक्टरवर बसून पुढचा रस्ता धरला. मात्र, सिल्लोड आगाराच्या दुरुस्ती पथकाच्या भरोशावर राहिलेल्या एका गर्भवतीसह ६ महिलांना बसमध्येच रात्रभर मुक्काम करावा लागला. 

मध्यरात्री दुरुस्ती पथक मध्यरात्री उशिरापर्यंत सिल्लोड आगाराचे दुरुस्ती पथक घटनास्थळी पोहोचले.  बस दुरुस्तीसाठी पहाटे ४ वाजले. औरंगाबादहून मंगळवारी दुपारी  निघालेली बस बुधवारी सकाळी पाचोऱ्यावरून सोयगावला पोहोचली.

माणुसकीचे दर्शनपाचोरा-अंधारी-औरंगाबाद या मार्गावरून ही सोयगाव आगाराची एकमेव बस सुरूआहे.वर्दळीचा नसलेला हा रस्ता केवळ या बसच्या नावाने ओळखला जातो. बसमध्ये अडकलेल्या महिला प्रवाशांना चालक व वाहकाने पायी  जाऊन  खिशातून पैसे खर्च करून पिण्याचे पाणी व खाण्याचे साहित्य उपलब्ध करून दिले. 

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबादpassengerप्रवासी