शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

डिक्कीत पैसे ठेवणे पडले महागात, ऊसतोड टोळी मुकादमाचे अडीच लाख पळविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 19:31 IST

पिशोर नाक्यावरील एचडीएफसी बँकेतून अडीच लाख रुपये काढून डिक्कीत ठेवले

कन्नड (औरंगाबाद) : बँकेतून काढलेले पैसे पिशवीत ठेवून  मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवणे ऊसतोड टोळी मुकादमास महागात पडले आहे. बस स्टॅण्ड समोर गाडी उभीकरून लघुशंकेसाठी जाऊन येण्याच्या वेळेत चोरट्यांनी  डिक्की उघडून पैशांची पिशवी पळविल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आहे.

दशरथ राठोड व त्यांचा मुलगा नारायण राठोड ( रा. भांबरवाडी ) हे उसतोड टोळी मुकादम आहेत. आज दुपारी नारायण राठोड याने शहरातील पिशोर नाक्यावरील एचडीएफसी बँकेतून अडीच लाख रुपये काढले. पासबुक तसेच रकमेसह पिशवी वडील दशरथ राठोड यांच्याकडे दिले. त्यांनी ती पिशवी मोटार सायकलच्या डिक्कीत ठेवली. सातकुंड  येथील बाबू चव्हाण हेही त्यांच्या सोबत होते. तेथून बसस्टॅण्ड समोरील ओळखीच्या टेलरच्या दुकानासमोर मोटार सायकल उभी केली. बाबू चव्हाण हे दुकानात गेले तर दशरथ राठोड हे लघुशंकेसाठी बसस्थानकात गेले. परत आल्यानंतर राठोड आणि चव्हाण घराकडे जाण्यासाठी निघाले. 

दरम्यान, पंचायत समिती कार्यालयाजवळील दुकानावर खरेदी केलेले सामान ठेवण्यासाठी डिक्की उघडली असता पैशांची पिशवी नसल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यांनी लागलीच पोलीस ठाणे गाठले. पोउपनि भुषण सोनार व पोकॉ कुलकर्णी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि भुषण सोनार करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद