शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

निजामाच्या विचारांचे लोक निवडून येतात हे मराठवाड्याचे दुर्दैव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 14:26 IST

निजाम हा अत्याचारी, पाशवी, क्रूर होता. त्याच्या विरोधात मराठवाड्यातील नागरिकांनी लढा दिला. मात्र आज त्याच निजामाच्या विचाराचे लोक महानगरपालिकांसह इतर ठिकाणी निवडून येत आहेत

ठळक मुद्देजितेंद्र आव्हाड यांची नाव न घेता ‘एमआयएम’वर टीका 

औरंगाबाद : मराठवाडा हा प्रदेश लढाऊ आहे. या भागातील लोकांनी लढा देऊन स्वातंत्र्य मिळविले. अत्याचारी, पाशवी निजामाचा पराभव केला. कासीम रझवीच्या विचारांना पाठिंबा देणाऱ्यांना आज मराठवाड्यातील लोक महानगरपालिकांमध्ये निवडून देतात, हे दुर्दैवी असल्याची टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘एमआयएम’चे नाव न घेता केली.

लोकसंवाद फाऊंडेशन आयोजित ४१ व्या मराठवाडासाहित्य संमेलनाच्या समोराप कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड बोलत होते. मराठवाड्याला एक वर्षे दोन महिने उशिरा स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारत सरकार मदतीला आले; परंतु मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा कासीम रझवी हा शरण आला, तेव्हा त्यास भारतात राहायचे की पाकिस्तानात, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याने पाकिस्तानची निवड केली. निजाम हा अत्याचारी, पाशवी, क्रूर होता. त्याच्या विरोधात मराठवाड्यातील नागरिकांनी लढा दिला. मात्र आज त्याच निजामाच्या विचाराचे लोक महानगरपालिकांसह इतर ठिकाणी निवडून येत आहेत, हे मराठवाड्याचे दुर्दैव आहे, असे आव्हाड म्हणाले.

मराठवाडा उपेक्षित कसाकौतिकराव ठाले पाटील यांनी मराठवाडा उपेक्षित राहिला असल्याचे सांगितले. त्यावर बोलताना गृहनिर्माणमंत्री आव्हाड म्हणाले, मराठवाड्याकडे दुर्लक्ष कसे झाले, असा प्रश्न उपस्थित करताना शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अमित देशमुख, राजेश टोपे यांच्यासह इतर मंडळी राज्याचे धोरण ठरविण्यामध्ये असते. तरीही मराठवाड्याला प्रतिनिधित्व मिळाले नाही, हे म्हणणे चुकीचे आहे. जायकवाडी प्रकल्प मराठवाड्यात आणण्यासाठी शंकरराव चव्हाण यांनी प्रयत्न केले. त्यामुळे विकास झाला नाही, असे कसे म्हणता येईल, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMarathwadaमराठवाडाmarathiमराठीliteratureसाहित्य